गांधीनगरमध्ये ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांचा धाडसी छापा!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 3 लाख 98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून परिसरात खळबळ उडाली आहे.तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.जगदीश भांबळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,गांधीनगर भागातील भाऊसाहेब रफायल बोर्डे हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला लोकांना जमवून तिरट जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने तत्काळ सापळा रचून अचानक छापा टाकला.
या छाप्यात 13 इसमांना ताब्यात घेण्यात आले.यांच्या कडून रोख रक्कम, वाहने व जुगार साहित्य असा एकूण 3,98,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.छाप्यानंतर पो.कॉ. बाळासाहेब भापसे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास स.फौ.गोपीनाथ गोर्डे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.जगदीश भांबळ,उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ.सुनिल चव्हाण,नितीन उगलमुगले,भानुदास खेडकर, योगेश चव्हाण,सुरज वाबळे, सुधीर खाडे,पो.कॉ.सुमित गवळी, अविनाश बर्डे,सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे,सुजय हिवाळे तसेच चालक पो.हे.कॉ.फसले यांनी केली आहे.ही कारवाई झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले असून,अशा अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची पुढील कारवाई अधिक वेगाने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
