रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हापुरवठा अधिकारी यांना निवेदन..त्या रेशन दुकानावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील दरेवाडी येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान क्र. ३३ मध्ये दरेवाडी,गोकुळवाडी,तुक्कड ओढा, हरीमळा आदी भागात नागरिकांना रेशन धान्य मिळत नसल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हापुरवठा अधिकारी हेमा बडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे समवेत महेश भोसले आदीसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सरकारमान्य परवानाधारक दुकानांमध्ये नियमितपणे रेशन मिळत नसल्याने सदर भागातील नागरिक नेहमीच त्रस्त असतात तसेच शासकीय आदेशानुसार महिन्यातील प्रत्येक दिवशी आठ तास दुकान उघडे असावे असा शासनाचा आदेश आहेत तसेच गावाच्या आठवडे बाजाराच्या दिवशी दुकान उघडे असावे असा देखील शासनाचा आदेश आहे याबाबतीत परवानाधारक दुकानदाराने फलक लावलेला आहे त्या फलकावर शासकीय आदेशानुसार दररोज आठ तास व आठवडा बाजाराच्या दिवशी दुकान पूर्ण वेळ उघडे राहील मात्र प्रत्यक्षात सदर दुकान हे महिन्यातील केवळ तीन ते चार दिवसच उघडे असते त्यातही नागरिकांना वेळेवर धान्य वितरित होत नाही तसेच तीन महिन्याच्या धान्याऐवजी केवळ एक महिन्याचे धान्य नागरिकांना देण्यात येते वरील सर्व गोष्टी लक्षात घेता महिन्याभरात कुपन धारकांना प्रतिव्यक्ती किती धान्य वितरित केले जाते याचा लेखी अहवाल देण्यात यावा व त्याचप्रमाणे सदर भागातील लोकांना वेळेवर धान्य वितरित केले जाते किंवा नाही याचा देखील अहवाल देण्यात यावा नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत सदर परवानाधारक दुकान क्रमांक 33 यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी संबंधितांवर लवकरात लवकर उचित कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.