कर्तव्यदक्ष कामगार तलाठी प्रविण दाहाके यांचे हिवरगाव पावसा येथे स्वागत..कला सम्राज्ञी पवळा कला मंचाने केला सत्कार
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- महसूल विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल परिचीत असलेले तलाठी प्रविण दाहाके यांचे हिवरगाव पावसा येथे स्वागत करण्यात आले.सजा हिवरगाव पावसा येथे नुकताच तलाठी प्रविण दाहाके यांनी पदभार स्वीकारला त्यांचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले.कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी कामगार तलाठी प्रविण दाहाके यांचा सत्कार करून स्वागत केले.तसेच सरपंच सुभाष गडाख यांच्या सह इतर ग्रामस्थांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी मंगल शुभेच्छा दिल्या.यापूर्वी त्यांनी नियुक्तीच्या गावांमध्ये शेतकरीभिमुख कामाचा ठसा उमटवला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक न करता उलट कार्यालयात अधिकाधिक वेळ देणारे तलाठी अशी त्यांची ओळख आहे.याशिवाय मागील वर्षात शेती पंचनामे, कोविडकाळातील कामगिरी याबाबतीत उत्कृष्ट काम केले आहे.अशा कर्तव्यदक्ष कामगार तलाठी प्रविण दाहाके यांनी शेतकऱ्यांच्या शेती,महसूल विषयक,पोट खराब संदर्भात, शेत रस्ते याबाबत गावात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सुयोग भालेराव, बाबासाहेब भालेराव,संतोष भालेराव,महसूल सेवक चंद्रकांत भालेराव,बाळासाहेब भालेराव, बच्चन भालेराव,विकास दारोळे यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ उपस्थित होते.