भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या २७ जुलै रोजीच होणार..आम्ही सर्व स्वाभिमानी भीमसैनिकांनी आवाज उठवला नसता तर याकडे कुणीच लक्ष दिले नसते..
नगर (प्रतिनिधी)-:-गेली अनेक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला,मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे. त्यामुळे ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना होत असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये सुशांत म्हस्के,योगेश साठे,प्रतीक बारसे,संजय कांबळे,बंडू आव्हाड,शैनेश्वर पवार,दया गजभिये,संदीप वाघमारे,हरीश अल्हाट,जीवन कांबळे,जय कदम,अविनाश वानखेडे,सिद्धांत कांबळे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, येणाऱ्या २७ तारखेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमचा विरोध कधीही नव्हता आणि कधीही केला नाही समाजाची दिशाभूल करण्यासाठी आमचा वापर केला गेला व आंबेडकरी चळवळीमध्ये नक्कीच दुफळी झाली आहे.फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आम्ही व आमच अस्तित्व आहे तसेच पुतळा पडद्याआडून मोकळा होतोय याचा समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाला अभिमान आहे व मोठ्या प्रमाणात आनंदही आहे त्यामुळे या अनावरणाच्या कार्यक्रमाला समस्त आंबेडकरी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण अनुभवावा व तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धम्मविधीने व बाबासाहेबांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञा घेण्यात याव्यात व भव्य दिव्य असा ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करून जयभीम जय भीमचीच घोषणा द्यावी अन्य कोणत्याही घोषणा देण्यात येणार नाही असे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.