सुगंधीत तंबाखु व मावा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात राहुरी येथील मावा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून आरोपीकडून 1 लाख 46,540/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना,पथकास गोपनीय मिळाली की,इसम नामे पप्पु जाधव हा वांबोरी ते देहरे जाणारे रोडलगत,मोरे वस्ती, वांबोरी येथे एका घराच्या खोलीमध्ये मशीनने सुगंधी तंबाखु व सुपारी मिश्रीत मावा विक्रीसाठी तयार करत आहे. पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी छापा टाकला एक इसम इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आल्याने राहुल उर्फ पिणु गोरक्षनाथ जाधव, वय 30, रा.वांबोरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे मुद्देमालाबाबत विचारपूस करता तो व त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पु गोरक्षनाथ जाधव, रा.वांबोरी,ता.राहुरी, जि.अहिल्यानगर (फरार) असे मिळून आर्थिक फायदयाकरीता मावा तयार करत असल्याचे सांगीतले.पथकाने घटना ठिकाणावरून 1,46,540/- रू किंमतीचा मुद्देमाल त्यात 15 किलो सुगंधीत मावा,10 किलो सुपारी,1 इलेक्ट्रीक मोटार व मशीन,एक वजनकाटा, 2 किलो चुना,सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन,आरोपी विरूध्द राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 794/2025 बीएनएस 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) सह अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.सोमनाथ वाकचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे,गणेश धोत्रे,रणजीत जाधव, विशाल तनपुरे यांनी केलेली आहे.