प्रहारच्या चक्काजाम आंदोलनास शिप्रतिष्ठाणचा सक्रिय पाठिंबा… बच्चूभाऊ कडू आपण सुरू केलेले आंदोलन म्हणजे लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा संघर्ष आहे शिवश्री राहुल ढेंबरे
प्रतिनिधी):- प्रहारचे प्रमुख श्री.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात २४ जुलै २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला असून सदर पत्रात शिवप्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी प्रहारचे प्रमुख श्री.बच्चूभाऊ कडू यांना आपण सुरू केलेले हे आंदोलन म्हणजे लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा संघर्ष आहे.

गुरुकुंज -मोझरी येथून सुरू झालेला हा लढा आता संपूर्ण राज्यातील लोकांच्या भावना व हक्कांचे प्रतीक ठरतो आहे आपल्या शांततेच्या मार्गाने सुरू असलेला चक्काजाम आंदोलनाला मी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे आणि केंद्र व राज्य सरकारने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी माझी आग्रही मागणी आहे या आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नव्हे तर त्या सामाजिक न्यायाशी निगडित आहेत जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर हा असंतोष व्यापक प्रमाणावर उफाळून येईल आणि त्यास शासनच जबाबदार असेल, आपल्या संघर्षास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा व शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. तसेच संबंधित निवेदनाच्या प्रती माहितीस्तव व पुढील कार्यवाहीसाठी ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन),ना.श्री.अजितजी पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन), ना.श्री.एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन),ना.श्री.माणिकरावजी कोकाटे (कृषिमंत्री, महाराष्ट्र शासन),रश्मिजी शुक्ला (पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलिस)यांनाही दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक / प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी न्यूज 24/7 शी बोलताना दिली.