उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपास निपक्ष करावा अभिषेक कळमकर.
प्रतिनिधी (अहिल्यानगर):-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांना महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आज न्यायालयात त्यांना हजर केले असता पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की किरण काळे मागील दहा ते बारा वर्षापासून शहराच्या राजकारणात सक्रिय असून शहरातील भ्रष्टाचार सर्वसामान्य वरील होणाऱ्या अन्याय विरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. नुकताच त्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील विकास कामांच्या भ्रष्टाचार विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यामार्फत चौकशीची मागणी केली आहे. काळे हे एका प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांना अनेक सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे न्याय मिळत असल्याने त्यांना भेटत असतात. अशावेळी त्यांच्या विरोधात अचानक एका महिलेकडून अत्याचाराचा गुन्हा दाखल होतो व त्यांना मध्यरात्री अटक केली जाते यामध्ये काही राजकीय षडयंत्र तर नाही ना या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष नलिनी गायकवाड, युवती समन्वयक खुशी जाधव, युवक शहराध्यक्ष रोहन शेलार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भीमराज कराळे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अत्तर खान, शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला, निलेश मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते निलेश मालपाणी, समीर पठाण,चंद्रकांत उजागरे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.