चंदनापुरीत चोरट्यांचा धुमाकूळ..धाडसी चोरीत रोख रकमेसह लाखो रुपयांचे साहित्य हडप..कांदा बियाणे,डीजे सिस्टीमच्या साहित्यासह लाखो रुपयांची लूट..धाडसी चोरीने पोलिसांना चोरट्यांचे आव्हानच
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-तालुक्यातील चंदनापुरी गावातील अतिशय गजबजलेल्या नाशिक पुणे हायवे लागत रॉयल ॲग्रो सर्विसेस,सन्मार्ट सुपर शॉपी या दोन दुकानांमध्ये नुकतीच धाडसी चोरी करण्यात आली आहे.चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचे चोरट्यांनी पोबारा केला.
येथील राहुल पाचोरे यांच्या मंगळवारी मध्यरात्री रॉयल ॲग्रो सर्विसेसचे शटर हत्याराच्या साहाय्याने उघडून रोख रक्कम चाळीस हजार रुपये तसेच किंमती कांदा बियाणे यांची चोरी केली. तर तर सिंधू लॉन्स लगत असलेले सागर रहाणे यांच्या मालकीच्या सन्मार्ट सुपर शॉपी मधून किराणा माल आणि सुपर शॉपी मध्ये ठेवलेले डीजे साऊंड सिस्टिम मशिनरी यांची अंदाजे चार लाख किमती साहित्याची चोरी केली.सकाळी सन्मार्ट सुपर शॉपीचे मालक दुकानात आल्यानंतर सुपर शॉप मध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चंदनपुरी पंचक्रोशीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
मंगळवारी मध्यरात्री परिसरातील लाईट बंद केली होती.तसेच नाशिक पुणे हायवे लगत बंद असलेल्या स्ट्रीट लाईट याचा गैरफायदा घेत कृषी केंद्र व किराणा सुपर शॉपी फोडून रोख रक्कम तसेच डीजेच्या साहित्याची धाडसी चोरी केली.टोल प्रशासन संबंधित ठेकेदार यांच्या आडमुठे धोरणामुळे रस्त्याच्या लाईट अनेक ठिकाणी बंद आहे. हिवरगाव पावसा टोलनाका परिसरात अवैध धंदे,आणि गुन्हेगारांची मोठी वर्दळ वाढली आहे.याचा मोठा त्रास पंचक्रोशीतील हायवे लगतचे व्यवसायिक,लोकांना सामान्य नागरिकांना होत आहे.पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्यामुळे ग्रामीण भागात दुचाकी चोऱ्या,दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागामध्ये तसेच टोल परिसरात रात्रीचे गस्त पथक नेमण्याचे परिसरातील नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.