शिबलापूर माळेवाडी वाळू डेपो चालक व ठेकेदार यांची होणार चौकशी..लेखी पत्रानंतर सहाव्या दिवशी संजय मुन्तोडे यांचे उपोषण मागे
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी येथील वाळू डेपो चालक व ठेकेदार यांच्या मनमानी, दडपशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी उपोषण सुरू केले होते.वाळू डेपो चालक व ठेकेदार यांनी घरकुल लाभार्थ्यांना नावाखाली वाळू दुसरीकडे चढ्या भावाने विक्री करत आहे.तसेच बेसुमार दिवस रात्र वाळू उपसा,बनावट पावत्या, नियमबाह्य तालुक्या बाहेर वाळू विक्री ठेकेदार करत आहे.वाळू डेपो चालक व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचार,आडमुठेपणा व बेकायदा कृत्याच्या विरोधात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही दखल न घेतल्यामुळे आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. शिबलापूर वाळू डेपोचे प्रकरण जिल्हाभरात चांगलेच गाजले त्यामुळे उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रशासनाने दखल घेत डेपो चालक व ठेकेदार यांची चौकशी करण्यात येणार असल्याच्या लेखी पत्रानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी मंडलाधिकारी व आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
शिबलापुर माळेवाडी येथील वाळू डेपो चालक व ठेकेदार दिवस रात्र बेसुमार वाळूचा उपसा करत आहे.घरकुल लाभार्थ्यांच्या नावे बनावट पावत्या करून वाळू तालुका बाहेर शिर्डी,कोपरगाव, श्रीरामपूर येथे चढ्या भावाने विक्री करतात,शिबलापूर व परिसरात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही.वाळू डेपो चालक व ठेकेदार यांच्या वर प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्यामुळे त्यांची मुजोरी व दादागिरी परिसरात वाढली
असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली.तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार व संबंधितांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले परंतु प्रशासकीय पातळीवर दबावापोटी कोणतेही कारवाई केली गेली नाही त्यामुळे संजय मुन्तोडे गेली सहा दिवस तलाठी कार्याला बाहेर उपोषणास बसले होते.सदर उपोषणास वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकर चळवळीतील विविध संघटना व संस्थांनी सदर उपोषणास पाठिंबा दिला.उपोषणास वाढत्या पाठिंबामुळे शिबलापूर वाळू डेपोचा विषय जिल्हाभरात चांगलाच गाजला.आणि अखेर सहाव्या दिवशी प्रभारी तहसीलदार गणेश आढारी यांनी वाळू डेपो चालक व ठेकेदार यांच्या विरोधातील तक्रारीं बाबत सखोल चौकशीचे लेखी पत्र दिले.दिनांक 21 जुलै रोजी पत्रानुसार चौकशी पथकाची नेमणूक करण्यात आल्याचे माहिती देण्यात आली.त्या संबंधिचे लेखी पत्र मंडलाधिकारी अनिल आव्हाड व आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनवणे तलाठी अंकित मंडलिक यांनी उपोषण स्थळी दिले तसेच उपोषण मागे घेण्याचे विनंती केली ठोस कारवाईच्या लेखी आश्वासनामुळे आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी ज्यूस घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले.
प्रकृती बिघडल्यामुळे संजय मुन्तोडे यांना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.लेखी आश्वासनानुसार संगमनेर तहसीलदार व महसूल अधिकारी यांनी दोषींवर कडक कारवाई करावी.अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणे भाग पडेल अशी प्रतिक्रिया संजय मुन्तोडे व शिबलापूर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.