फसवणुकीचे गुन्हे करणारा सराईत आरोपी सोन्याच्या दागिन्यासह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीकडून दोन गुन्ह्यातील एकूण 60,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत कोतवाली पोलीसांनी त्यास जेरबंद करण्याची कारवाई केली आहे.कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.685/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319 (1), 316(2), 318 (4) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड व अंमलदार यांना सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत कळविल्याने पोसई/कृष्णकुमार सेदवाड व अंमलदार यांनी सदर अज्ञात आरोपीचा तांत्रिक विष्लेशनाचे आधारे शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक, प्रताप दराडे यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की आरोपी वारुळाचा मारुती,नालेगाव,अहिल्यानगर येथे आहे.
अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक, प्रताप दराडे यांनी पोसई/कृष्णकुमार सेदवाड यांना सदरची माहिती कळविली असता पोसई/कृष्णकुमार सेदवाड व स्टॉफ सदर संशयीत इसम याचा शोध घेत असतांना वारुळाचा मारुती,नालेगाव, अहिल्यानगर येथे एक संशयीत इसम फिरतांना मिळून आला. त्यास थांबवुन त्याचे नाव गाव विचारले असता तो उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागला. त्यावेळी पोसई/कृष्णकुमार सेदवाड व स्टॉफ यांनी सदर संशईत इसमास ताब्यात घेवून कोतवाली पोलीस स्टेशन येथे चौकशीकामी आणले व सदर संशईत इसमास विश्वासात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानदेव हरीभाऊ चेडे (वय 37 वर्षे) असे सांगितले.त्याचेकडे चौकशी करता त्याने कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं.685/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319(1), 316(2), 318 (4) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्ह्यातील फसवणुक करुन चोरुन नेलेल्या मुद्देमाल 30,000/- रुपये किंमतीची सोन्याची लगड काढुन दिली.त्यानंतर त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 696/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319 (1), 316(2), 318 (4) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर गुन्ह्यातील फसवणुक करुन चोरुन नेलेल्या मुद्देमाल मुद्देमाल 30,000/- रुपये किंमतीची सोन्याची लगड काढून दिली.
कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 685/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम-319(1), 316(2), 318 (4) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोहेकाँ/2251 योगेश दिपक कवाष्टे हे करीत असून कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं.696/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319(1), 316(2), 318 (4) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/479 गोविंद दादासाहेब गोल्हार हे करीत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, पोसई/गणेश देशमुख,गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड,पोहेकॉ/१३८१ सलीम शेख,पोहेकॉ /१५७९ विनोद बोरगे,पोहेकॉ/१०९ बाळकृष्ण दौंड,पोहेकॉ/२१५८ विशाल दळवी,पोहेकॉ/९३२ विक्रम वाघमारे,पोहेकॉ/८९३ सुर्यकांत डाके,पोहेकॉ/४७९ गोविंद गोल्हार,पोहेकॉ/२२५१ योगेश कवाष्टे,पोकॉ/१७८२ सत्यजीत शिंदे,पोकॉ/१७८२ अतुल काजळे,पोकॉ/१४६४ अभय कदम,पोकॉ/२४७० अमोल गाडे, पोकॉ/१०१ सोमनाथ केकाण, पोकॉ/२४६४ महेश पवार, पोकॉ/१५५३ शिरीष तरटे, पोकॉ/३६५ सचिन लोळगे, पोकॉ/१७६७ दत्तात्रय कोतकर, मपोकॉ/४८९ प्रतिभा नागरे, दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडु यांनी पथकाने केली.