पोस्कोसह स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यात तब्बल 11 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यातील तब्बल ११ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशी की,तेन्दुकोना पोलीस स्टेशन, जिल्हा महासमुन्द,राज्य छत्तीसगड येथील गुन्हा रजि नं. ४७२/२०२०१४, भा.दं.वि.क २९४,५०६, प्रमाणे, गुन्हा रजि नं. २४/२०१६, मां.द.वि.क भा.दं.वि.क ३६३, ३७६, ३२३, सह पोस्को ६ प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी भुवन पुरुषोत्तम पांडे हा हजर राहत नसल्याने त्यास त्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश,जिल्हा महासमुंन्द,राज्य छत्तीसगड यांच्या कडील यांनी स्टॉडिंग वॉरंन्ट काढले होते.
भुवन पुरुषोत्तम पांडे हा गुन्हा दाखल झालेपासून सदर गुन्ह्यात छत्तीसगड पोलीसांना मिळून येत नव्हता.बुन्देली चौकी,तेन्दुकोना पोलीस स्टेशनकडील नेमणुकीचे पो.हे.कॉ ३६७ इंद्रजीत ठाकुर, पो.को ३०९ हिवराज कुन्हे हे दि.०४ ऑगस्ट २०२५ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल होवुन पाहीजे असलेला आरोपी नामे भुवन पुरुषोत्तम पांडे याचा शोध होणेबाबत लेखी रिपोर्ट दिला असता तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी सेक्टर ड्युटीचे पोकॉ.८६८ शफी शेख,पोकॉ.१२३० महेश पाखरे यांना सुचना देवून आरोपीचा शोध घेणेकामी छत्तीसगड पोलीसांसोबत रवाना केले असता पो.कॉ शफी शेख व महेश पाखरे यांनी गोपनिय बातमीदारामार्फत आरोपी भुवन पुरुषोत्तम पांडे याचा शोध घेवून त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव भूवन पुरुषोत्तम पांडे, वय ५१ वर्ष, मूळ रा. घर नं. ६९, वॉर्ड नं.१४, गाव फरदोहा, ता पिठोरा, जिल्हा महासमुन्द, राज्य छत्तीसगढ़, हल्ली रा.शिवाजीनगर,कल्याण रोड,ता.जि.अहिल्यानगर असे सांगून सदर गुन्हा दाखल असल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी छत्तीसगढ़ पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, नगर शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पो.हे.कॉ.शफी शेख, पो.कॉ १२३० महेश पाखरे यांनी केली आहे.