माजी नगरसेवकाच्या हॉटेलवर वीजचोरी..कोतवालीत गुन्हा दाखल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-माजी नगरसेवक बोराटे यांच्या हॉटेलवर वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून माळीवाड्यात असलेल्या नामांकित हॉटेलवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विजचोरी प्रकरणी थेट गुन्हा दाखल केला आहे.तब्बल १२ महिन्यांपासून विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून सुमारे १.२३ लाखांची विजचोरी झाल्याचं उघड झालं आहे.
त्यामुळे कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महावितरणच्या तांत्रिक तपासणीत ५२७९ युनिट विजेचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट झालं आहे.याबाबत कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.