गुलमोहर रोडवरील आम्रपाली मंगल कार्यालय येथे मंगळागौर महिला उत्सवाचे आयोजन.. प्रशिक्षित महिलांचा कलाविष्कार पारंपारिक मंगळागौर गाणी नृत्य व खेळ सादर केले जाणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- मानसी मंगळागौर टीमच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी मंगळागौर महिला उत्सव आम्रपाली मंगल कार्यालय गुलमोहर रोड येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.या कार्यक्रम शिबिरात प्रशिक्षित महिलांचा कलाविष्कार पारंपारिक मंगळागौर गाणी नृत्य व खेळ सादर केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेखा डावरे,रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलकर,डॉ.दमन काशीद,राजू टाक आदी उपस्थित राहणार आहे.सदरील कार्यक्रमाचे नरेश बडेकर,डॉ. प्राजक्ता सावेडकर प्रसिद्ध निवेदिका निवेदन सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन सौ.प्रतिभा देठे,सीमा देशमुख, डॉ.संगीता खंडागळे,अर्चना शिंदे, प्रा.तेजस्विनी आहेर,डॉ. गीतांजली सोनवणे,रिपिका खरात यांनी केले आहे.