अकस्मात मृत्यू प्रकरणाचा झाला उलगडा..शिकारी वरून झाला होता वाद लोखंडी गज डोक्यात घालून केला खून..स्थानिक गुन्हे शाखेचा तपास दोघे जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव येथील अकस्मात मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून दोन आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.०९ ऑगस्ट २०२५ रोजी शेवगाव पोलीस ठाणे हद्दीतील (ठाकूर पिंपळगाव,ता. शेवगाव,जि.अहिल्यानगर) येथील ऊसाच्या शेतात अंदाजे २०-२२ वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृत्यू संशयास्पद असल्याने सदर प्रकरण शेवगाव पोस्टे येथे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ९४/२०२५, भा. न्या. सु. सं. कलम 194 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.तपासा दरम्यान मयताची ओळख पटवून त्याचे नाव आकाश लक्ष्मण किडमिचे (वय २० वर्षे,रा. रामनगर,शेवगाव) असे निश्चित करण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय चंदर किडमिचे (वय २० वर्षे),अरुण लाला उपदे (वय १९ वर्षे)
(दोघे रा. रामनगर,शेवगाव,जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून मयताचा खून केल्याची या आरोपींनी कबुली दिली आहे.दोन्ही आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून,पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक,डॉ. बसवराज शिवपुजे विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर (अतिरिक्त कार्यभार शेवगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,पोहेकॉ २१५९ हृदय घोडके,पोहेकॉ किशोर शिरसाठ, पोहेकॉ सागर ससाणे,पोहेकॉ प्रमोद जाधव व चासफ़ो उमाकांत गावडे यांनी केली आहे.
