वसई विरार महानगरपालिके अंतर्गत ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बचत गटांसाठी विविध स्टॉलचे आयोजन,बचतगटाच्या माध्यमातून महिलांना मिळणार आर्थिकदृष्ट्या आधार
वसई विरार/प्रतिनिधी (मनीषा जाधव):-सर्वसाधारण 15-20 लोकांचा/महिलांचा तसेच निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांच्या उन्नती,विकास व फायद्यासाठी एकत्रित येण्यासाठी बनवलेला समूहाला बचतगट म्हणतात या गटात महिलांनी बनवलेलल्या वस्तूंची विक्री होते याने महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होते.
वसई विरार महानगरपालिका दिनदयाळ अंत्योदय योजना DAY NULM विभागा अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि.१२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असे ३ दिवसासाठी,सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत महिलांनी बचतगटामार्फत स्टॉल लावलेले आहेत.यामध्ये महिलांनी स्वतःबनवलेली उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली आहे.महानगरपालिकेने व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा जाधव यांनी जनतेस आवाहन केले आहे की आसपासच्या परिसरातील लोकांनी या बचतगटांच्या स्टॉल ला भेट द्यावी व तेथे खरेदी करून महिला बचत गटांना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे.