चैन स्नॅचींग करणाऱ्या सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-चैन स्नॅचींग करणाऱ्या सराईत आरोपीस जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले असून आरोपीच्या ताब्यातून १ लाख २५,०००/- रु.किं.चा सोन्याचा मुद्देमाल व मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.०६ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी सौ.सिताबाई दिनेशकुमार मंडल (वय-६०, रा-कविजंग नगर,गुलमोहोर रोड, ता.जि.अहिल्यानगर) या पहाटे ०५:३० वाजेचे सुमारास नवलेनगर येथील मारूती मंदिरातुन दर्शन घेवुन घरी जात असताना ०५:४५ वाजेचे सुमारास एक इसम त्यांचे पाठीमागे आला व फिर्यादी यांना काही समजण्याच्या पुर्वीच गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन तोडुन त्याच्याकडील मोटारसायकलवर पळून गेला वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ८१३/२०२५ भा.न्या.सं.क.३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्ह्याचे तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे किरण दशरथ पालवे (वय-२४, रा-नागापुर गावठाण,ता.जि. अहिल्यानगर) याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी नागापुर परिसरात जावुन सापळा लावून ताब्यात घेण्यात आले असता त्याने गुन्ह्याचे कबुली देवुन त्याचे कडुन गुन्ह्यातील चोरी केलेले ८ ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे अर्धवट तुटलेले मंगळसुत्र त्यामध्ये सोन्याचे मणी व डोरले असलेले जु.वा.जप्त करण्यात आले असुन आरोपीने गुन्हा करते वेळी वापरलेली मोटारसायकल असा एकुण १,२५,०००/- रु.कि चा मुद्देमाल आरोपीकडुन गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे अहिल्यानगर,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पो.नि.आनंद कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पो.हे.कॉ.सुनिल चव्हाण, नितीन उगलमुगले,अब्दुलकादर इनामदार,योगेश चव्हाण, भानुदास खेडकर,सुधिर खाडे, सुरज वाबळे,पो.कॉ.सुमित गवळी,अविनाश बर्डे,सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे,सतिष भवर, दादा रोहोकले,भागवत बांगर यांनी केली आहे.