खुनाच्या गुन्ह्यात लॉकअपमध्ये असलेल्या दोघांनी गज कापून केले होते पलायन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिताफिने केले जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाच वर्षापूर्वी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअपचे गज कापुन खुनाच्या गुन्ह्यातून पळालेल्या ०२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशि की,टरबुज व्यापारी हसन उमर शेख (वय ५० वर्षे रा.मालवणी मालाड वेस्ट,गेट नं.६,प्लॉट नं. १५,रुम नंबर ७७,न्यु कलेक्टर कंम्पाऊंड,मुंबई) याचे ताब्यातील टरबुज भरलेली ट्रक नंचर एम. एच. ४३ बाय ७५९९ हिचे मधील टरबुज परस्पर विकण्याचे हेतुने आरोपी नामे मोहन कुंडलिक भोरे व त्याचे इतर ४ साथीदार अशांनी मयत हसन उमर शेख याचा गळा आवळून व खुन करुन त्याचे प्रेत खंड गांवचे शिवारात भिमा नदीचे पात्रामध्ये टाकुन दिले होते.सदर खुनाचे घटने बाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १ १५५/२०१८ भादवि कलम ३०२, २०१, १२० (ब), ३४ प्रमाणे दि.२८/०५/२०१८ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे १) अक्षय रामदास राऊत वय २८ वर्षे. २) चंद्रकांत महादेव राऊत वय ३० वर्षे,दोन्ही रा.पारेवाडी, ता.जामखेड,जि.अहिल्यानगर व त्यांचे इतर ०३ साथीदार असे नमुद गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होते.
सदर आरोपी हे दि. १०/०२/२०२० रोजी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअपचे छताचे प्लायवुड व गज कापुन छतावरील कौल उचकटुन पळून गेलेले आहेत.सदर आरोपी पलायन घटनेबाबत पोना ३१३ रावसाहेब दशरथ नागरगोजे नेम कर्जत पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९६/२०२० भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी नामे १) ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, २) मोहन कुंडलिक भोरे, ३) गंगाधर लक्ष्मण जगताप हे मिळून आल्याने त्यांना यापुर्वीच अटक करण्यात आलेले आहेत.उर्वरीत आरोपी नामे अक्षय रामदास राऊत,चंद्रकांत महादेव राऊत हे आजपावेतो मिळून आलेले नव्हते.वरील दोन आरोपी हे मागील ५ वर्षापासून फरार असल्याने व ते आजपावेतो मिळुन आलेले नसल्याने श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना सदर आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेशीत केलेले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक तयार करुन सदर पथकास फरार आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेणेबाबत मार्गदर्शन व सुचना देवून सदरचे पथक रवाना करण्यात आलेले होते.दि. १३/०८/२०२५ रोजी पथक नमुद गुन्ह्यातील फरार आरोपींची माहिती काढत असतांना पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढून आरोपी नामे १)अक्षय रामदास राऊत वय २८ वर्षे, २) चंद्रकांत महादेव राऊत वय ३० वर्षे, दोन्ही रा. पारेवाडी, ता. जामखेड,जि. अहिल्यानगर यांना फुलगांव एम.आय.डी.सी. जिल्हा पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६/२०२० भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार हृदय घोडके,बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे,रोहित येमुल, प्रशांत राठोड,अरुण मोरे यांनी केलेली आहे.