महिला साथीदाराच्या मदतीने दिवसा घरफोडी करणारा ‘टोण्या’ अखेर एलसीबी कडून जेरबंद..तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील संगमनेर येथील महिला साथीदाराच्या सहाय्याने दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 48 तासाच्या आत जेरबंद करून या आरोपी कडून 11 लाख 79,140 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने व्यवसायिक,तांत्रिक कौशल्याच्या आधारे केली आहे.यातील टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे (रा.लखमापूरी ता.शेवगाव) हा आरोपी अत्यंत सराईत असून त्याच्यावर जिल्यात व शेजारील जिल्ह्यात अनेक गभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,राजेंद्र वाघ,गणेश लोंढे, फुरकान शेख,सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे,अमृत आढाव,अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर,बाळासाहेब गुंजाळ,सुनील मालणकर,प्रशांत राठोड,महादेव भांड,चंद्रकांत कुसळकर,मापोना.सारिका दरेकर,ज्योती शिंदे यांनी केली आहे.