आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव जयंती निमित्त कलावंतांची मानवंदना..उत्साही वातावरणात वाजत गाजत फुलांच्या वर्षावात मिरवणूक..कलावंतांनी केलेल्या सवाद्य सप्तसुरांच्या स्वागताने विद्यार्थी भारवले.
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांनी १९ व्या शतकातील अलौकिक व सामान्य व्यक्तिमत्व,कला संस्कृती व समाज प्रबोधना बरोबर मोठे परिवर्तनाचे कार्य केले पवळा भालेराव यांनी लोककला क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले आणि इतिहास घडला.महाराष्ट्राच्या कला संस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला.त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे कलाक्षेत्राचे द्वार महिलांसाठी खुले झाले.१९ व्या शतकात कला क्षेत्रात नामचंद पवळा भालेराव यांनी केलेल्या क्रांतीमुळे त्यांना क्रांतिकारक म्हटले पाहिजे.इतिहासात एका कलावंताला पाहण्यासाठी तिकीट असणे एक अलौकिक अनन्य साधारण घटना आहे. हिवरगाव पावसा या भूमीमध्ये जन्मलेल्या पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मृतीचे जतन करण्याचे काम कला सम्राज्ञी पवळा कला मंच हि संस्था करत आहे.नामचंद पवळा यांच्या भव्य स्वरूपाच्या स्मारकाची उभारणे शासनाने करावी.
आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोककला अभ्यासक संशोधक प्राध्यापक भगवान अहिरे म्हणाले की, तुमच्यात क्षमता निर्माण होईपर्यंत कोणत्याही क्षेत्रात सहभाग घेऊ नये.एकाग्रता सर्वात महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेतील भाग आहे. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे आणि पुस्तकांची कास धरावी. दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. तुमचा शालेय अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा,कोणत्याही स्पर्धा परीक्षेत तुम्ही यशस्वी व्हाल स्वतःलाच चांगले सिद्ध कराल. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही.स्पर्धा परीक्षेसाठी कष्ट करावे लागतात.आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर तर मोठे यश साध्य होऊ शकते.आंबेडकरी चळवळीतील संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.किरण रोहम म्हणाले आद्यनृत्यांगणा पवळा यांच्या कला क्षेत्रातील योगदानावर अभ्यास व संशोधन साठी परदेशातून व्यक्ती येथे येतात हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे.हिवरगाव पावसा ग्रामपंचायतने आद्यनृत्यांगणा पवळा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे मागणी करणारा ठराव केल्याबद्दल सरपंच सुभाष गडाख यांचे अभिनंदन केले. तसेच पवळा यांच्या स्मारकाच्या प्रश्नावर आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तर शिवसेना शिंदे तालुकाध्यक्ष रमेश काळे यांनी पवळा यांचा स्मारकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,संगमनेर आमदार अमोल खताळ यांच्या मार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
माजी मुख्याध्यापक रघुनाथ भालेराव यांनी पवळा यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला.इतिहासातील घटनांचे प्रसंग सांगून पवळा यांना कलेच्या माध्यमातून मानवंदना दिली.तर सेवानिवृत्त शिक्षक वसंत साबळे यांनी हिवरगावची माती आणि माणसं हे ज्ञानी आहेत.त्यांचा आगळं वेगळं महत्त्व आहे.त्यांनी कला क्षेत्राबरोबर सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व इतर क्षेत्रात हिवरगावचे नाव मोठे केले आहे. आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले, डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचार मंच हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच प्राध्यापक भगवान अहिरे यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.लोक कलावंत कवी गायक हरिश्चंद्र तथा हरिदास भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यक्रमातून कलावंतांनी नामचंद पवळा यांना मानवंदना दिली.विद्यार्थ्यांनसाठी प्रयोगात्मक कला प्रकाराचे आयोजन केले होते.देवगड विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वाजत गाजत फुलांच्या वर्षावात मिरवणूक काढली.कलावंतांनी केलेल्या सवाद्य सप्तसुरांच्या स्वागताने विद्यार्थी भारवले.
कार्यक्रमास भीमशक्ती तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजनदान देण्यात आले.तसेच शालेय साहित्याची मदत करणारे माजी समाजकल्याण सभापती जि.प.गणपत सांगळे,उद्योजिका नंदा पवार,चित्रपट कथा लेखक आबा गायकवाड,संजय गिरी,अमित काळे,इंजि.बाबुराव भालेराव,हरिश्चंद्र भालेराव,संदीप भालेराव,गणेश दवंगे,संदीप मोकळ,छबन मुन्तोडे,राजेंद्र उबाळे,बाबुराव पावसे,वसंत साबळे यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ व सर्व देणगीदारांचे आभार संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव आणि नितीनचंद्र भालेराव यांनी मानले.कार्यक्रमास सरपंच सुभाष गडाख,ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे,सोसायटीचे संचालक अशोक भालेराव, शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव पावसे,अप्पासाहेब गडाख, सीताराम गडाख गुरुजी,शैला भलेराव,संस्थेच्या उपाध्यक्ष रंजना भालेराव,अनिल पवार यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भालेराव,संजय भालेराव,बच्चन भालेराव,यादव भालेराव,मन्सूर इनामदार,रोहिणी भालेराव,सुयोग भालेराव,प्रल्हाद मोकळ, बाबासाहेब कदम,भाऊसाहेब निळे,विजय निळे,हितेन संगारे, मच्छिंद्र गडाख,समाधान भालेराव,चंदू भालेराव, भाऊसाहेब बोऱ्हाडे,विलास पावसे,प्रकाश टपाल,जयराम गायकवाड,लहानु भालेराव मुकेश दारोळे,विकास दारोळे यांच्या सह हिवरगाव पावसा बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थी ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास देवगड विद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.