सराफ व्यापाऱ्याचे मौल्यवान सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या ड्रायव्हरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात मधून ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तीन महिन्यापुर्वी शिर्डी येथून सराफ व्यापाऱ्याचे तब्बल ३,२६,००,०००/- रू.किंमतीचे २६८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम घेवुन पसार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत गुजरात राज्यातुन जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५,धंदा सोने व्यापारी,रा. आवाल घुमटी,ता.अमिरगढ, जि. बनासकाटा,गुजरात) हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी,श्रीरामपूर, कोल्हार,सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यवसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले होते.दि. १३/०५/२०२५ रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा.चौहटन, जि.बारमेर,राजस्थान हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने ३,२६,००,०००/- रू.किमतीचे दागीने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३२/२०२५ बीएनएस कलम ३०६, ३१६ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी विशेष पथक तयार करण्यात आले.तपास पथकाने गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढुन आरोपी यास तलोद,जि.साबरकाठा, गुजरात येथुन ताब्यात घेण्यात आले.ताब्यातील आरोपी यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार अमृत आढाव,भगवान थोरात,प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.