स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..येथे सापळा रचून तिघांसह पाच गावठी कट्टे नऊ जिवंत काडतूस जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपूला जवळ हरेगाव फाटा येथे मोठी कारवाई करत सापळा रचून पाच गावठी कट्टे,नऊ जिवंत काडतुसे व पल्सर मोटारसायकल जप्त करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.हि कारवाई मिळालेल्या गुप्त बातमी दारामार्फत दि.02 सप्टेंबर रोजी पथकाने केली आहे.
अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, (वय 23 वर्षे, रा. फत्तेपुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अजय शिवाजी मगर, (वय 25 वर्षे, रा. नांदुर शिखरी,ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) योगेश मच्छिंद्र निकम, ( वय 35 वर्षे, रा. वडगांवगुप्ता, ता. नगर, जि. अहिल्यानगर) असे पकडलेल्या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे श्रीरामपूर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे,अतुल लोटके,उमेश खेडकर,दिगंबर कारखेले,मल्लिकार्जुन बनकर,दिपक घाटकर,फुरकान शेख,प्रशांत राठोड,विशाल तनपुरे,उमाकांत गावडे यांनी केली आहे.