युवा प्रतिष्ठान रायगड आयोजित माझी शाळा माझा अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न
रायगड (प्रतिनिधी):-युवा प्रतिष्ठान रायगड आयोजित माझी शाळा माझा अभियान हा कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे गाव येथे प्राथमिक शाळेत आयोजित केला होता.सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले श्रीवर्धन रायगड युवा प्रतिष्ठान गेले 2022 म्हणजेच 3 वर्षा पासून समाजकार्य करत आहे.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर व हॉस्पिटल सेवा व मुंबई सेंटर ते बागमंडळ बससेवा चालू करण्याबाबत तसेच श्रीवर्धन तालुक्यातील समस्या येथील नागरिकांसाठी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट नेण्यासाठी सदैव सेवेसाठी काम करते. तसेच आपण एक समाजाचं देणं लागतो हे ध्येयधोरण घेऊन युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक कार्य करत असते.
कार्यक्रमासाठी श्री.सुजित भाई तांदळेकर व युवा प्रतिष्ठान रायगडचे संस्थापक श्री.अमर शंकर खेरटकर,उपाध्यक्ष श्री गणेश निर्मळ,सल्लागार श्री. निशांत शिगवण,मयूर शिगवण, संघटक प्रमुख श्री.विशाल सावंत,प्रतिष्ठानचे विभाग संघटक तसेच माजी सभापती श्री. बाबुराव विठ्ठल चोरगे, सरपंच सौ.गीता चोरगे, उपसरपंच श्री.बबन जोशी, ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य श्री.लक्ष्मण भुवड,समस्त ग्रामस्थ मंडळ स्थानिक अध्यक्ष श्री.अनंत चोरगे,स्थानिक महिला मंडळ अध्यक्षा सौ.लक्ष्मी गोपीनाथ चोरगे,सौ.वंदना बाळकृष्ण म्हसकर,कारिवणे गाव गणेश मंडळ स्थानिक अध्यक्ष श्री.अनंत बाळाराम बर्जे, शाखाप्रमुख श्री.किसन शंकर चोरगे,मुंबई मंडळ अध्यक्ष (CA) श्री.मनोज रामाने,मुंबई मंडळ उपसचिव श्री.महेंद्र रामाणे,पोलीस पाटील सौ.आकांक्षा आकर्षण चोरगे,पोलीस पाटील श्री.हरिश्चंद्र चोरगे,अंगणवाडी सेविका सौ.अमृता अक्षय चोरगे, युवा प्रतिष्ठान संघटन शाखा श्री.सतिश चोरगे,ग्रामपंचायत शिपाई सौ.शितल शशिकांत चोरगे,ग्रा.पं.सदस्य श्री.गणेश भुवड,श्रमजीवी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरिक श्री.सखाराम चोरगे,ज्येष्ठ नागरिक श्री.बबन चोरगे,ज्येष्ठ नागरिक श्री.हरिश्चंद्र भुवड,जि.प.शाळा मुख्याध्यापक श्री,प्रल्हाद चिंतामण बागुल सर, शिक्षक श्री.रमेश पांडु चौधरी, शा.व्य.शिक्षक सर राजु भुवड,अध्यक्षा सौ.श्रुती भुवड,स्थानिक गावचे युवा कार्यकर्ते श्री.अक्षय चोरगे,श्री.महेंद्र साहेब, श्री.चंदन म्हसकर,श्री.बबन मांडवकर,श्री.सुदेश चोरगे, श्री.विनोद चोरगे,श्री.पंकज चोरगे,श्री.प्रशांत बजै,श्री.रविंद्र पाटेकर,सुनिल रामाणे, सुहास चोरगे,मुकेश चोरगे गावातील ज्येष्ठ नागरिक यांनीही आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
