जिल्हाध्यक्ष अजितभैया कव्हेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडलाच्या वतीने वृक्षारोपन करून नागरिकांना दिला सामाजिक संदेश..पर्यावरण संरक्षण काळाजी गरज-सौ.निर्मलाताई कांबळे
लातूर (प्रतिनिधी):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडलाच्या वतीने वृक्षारोपन करून सामाजिक संदेश देत भाजपा जिल्हाध्यक्ष अजितभैया पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंडल अध्यक्षा सौ.निर्मलाताई कांबळे म्हणाल्या की,पर्यावरण संरक्षण काळाजी गरज आहे.लातूर शहरात समाधानकारक पाऊस झाल्याने वृक्ष लागवडीस पोषण वातावरण असल्याने आज सोमवार दि.१ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजितभैया पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद चौक येथे भाजपा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडलाच्या वतीने वृक्षारोपण करून वातावरणातील समतोल राखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सौ. निर्मलाताई कांबळे यांनी वृक्षारोपन करूया,वृक्षांचे संगोपन करूया,आपले जीवन अमुल्य प्रदुषण मुक्त करुया, वृक्षारोपण केल्याने वातावरणातील ऑक्सीजन मोठया प्रमाणात वाढेल, वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वस्थ” पर्यावरणाचे सौरक्षण काळाजी गरज असा सामाजिक संदेश दिला.यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.रागिणीताई यादव यांची प्रमुख उपस्थितीत,भाजपा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्षा सौ.निर्मलाताई कांबळे, भाजपा पदाधिकारी रवी सुडे, किशोर जैन,किशन बडगिरे, बाबा गायकवाड,राजन सोनवणे, अरुण जाधव,महंम्मद शेख, राजकुमार गोजमगुंडे,महादेव कानगुले,किशोर काळे,विजय आवचारे,मुन्नाभाई हाश्मीजी, गणेश मस्के,सौ.रत्नमाला घोडके,रेखा टेकाळे,ज्योती रसाळ,आकाश खैरमोडे,जमीर शेख,अरूण जाधव,शामल गोखले,शामा खराडे,शन्नोताई शेख,सुनिल कांबळे,माणिक पवार,रमेश हनमंते, नागोराव कुंभार यांच्यासह परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
