माळीवाड्यात तलवार हातात घेऊन दहशत करणारा कोतवाली पोलिसांच्या ताब्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तलवार व कब्जात कोयता व लाकडी दांडके जवळ बाळगुन माळीवाड्यात दहशत पसरवणा-या इसमास कोतवाली पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे.हि कारवाई दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आले आहे.कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,माळीवाडा परीसरातील साठे वसाहत येथे इसम नामे सचिन अनिल गायकवाड वय 35 वर्ष हा साठे वसाहत येथे हातात तलवार घेवुन तेथील लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे उद्देशाने मोठ मोठ्याने ओरडत फिरत आहे.
सदरची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलिसांनी सदरील ठीकाणी जावुन खात्री केली असता एक इसम त्याचे हातात तलवार घेवुन सार्वजनिक ठीकाणी दहशत करतांना मिळुन आल्याने जागीच ताब्यात घेवुन त्याचे घराजवळ पाहणी केली असता त्याचे कब्जात तलवार व कोयता मिळून आला. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल दिलीप गाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. II. ७८१/२०२५भारतीय शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ४/२५ प्रमाणे दाखल गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ.बाळकृष्ण भगवान दौण्ड हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबुर्मे,उपविभागिय पोलीस अधिकारी शहर भाग श्री. शिरिष वमने,कोतवाली पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई./गणेश देशमुख,पोहेकॉ/बाळकृष्ण दौण्ड,पोहेकॉ/विक्रम वाघमारे पोहेकॉ/सुर्यकांत डाके,पोहेकॉ/विनोद बोरगे,पोहेकॉ/विशाल दळवी,पोहेकॉ/सलीम शेख, पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/अतुल काजळे,पोकॉ/शिरिष तरटे, पोकॉ/हरीदास कोतकर,पोकॉ/सचिन लोळगे,पोकॉ/सत्यम शिंदे,पोकॉ/महेश पवार,पोकॉ/सोमनाथ केकाण,मपोकॉ/प्रतिभा नागरे यांनी केली आहे.
