ग्रामविकास अधिकाऱ्यावर हल्ला..गचांडी पकडून शिवीगाळ करत दिली धमकी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जोर्वे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार (दि.1 सप्टेंबर) रोजी माहितीच्या मागणीवरून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर एकाने हल्ला केला.या घटनेत अधिकार्याची गचंडी धरून शिवीगाळ,धमकी व मारहाण करण्यात आली.

याच बरोबर सरकारी कामकाजात अडथळा आणत कार्यालयातील प्रोसिडिंग रजिस्टरची पाने फाडून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी बाजीराव केशय पवार (वय 54, रा. लोणी बु., ता.राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र थोरात याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
