श्रीकृष्ण बालगणेश मंडळातर्फे फळ वाटप..मुलं म्हणजे देवाघरची फुल निर्मलाताई कांबळे
लातूर (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील ज्ञानेश्वर चौक श्रीकृष्ण बाल गणेश मंडळ नाथनगर येथील गणपती बाप्पाच्या सामूहिक आरतीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्षा निर्मलाताई कांबळे व रवीभैय्या सुडे यांना आमंत्रित केले होते.यावेळी मंडळातील लहान बालकांच्या उत्साह पाहुण लहानपणीच्या गणपतीतील आठवणी ताज्या होऊन मन भारावून गेले असे मत यावेळी सौ.कांबळे यांनी व्यक्त करून मुलं म्हणजे खरंच देवाघरची फुल आहेत असे गौरवद्वार काढले.

मंडळाच्या वतीने सौ. कांबळे यांचा शालू व पुष्पहार घालून यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी सौ. कांबळे यांनी गणरायाला साकडे घालीत येणाऱ्या काळात सर्वांना सुखी,समृद्धी,ठेव असे म्हणत बालकांना प्रसाद म्हणून फळं वाटप केले.यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष राजवीर अतुल पाटील,उपाध्यक्ष कृष्णा जाधव,संकल्प दांडीमे,श्रीयन नांद्रे,आरोह सावंत,धर्मा गायकवाड,सर्व बाल गोपाळ,महीला भगिनी तसेच अश्विनी नांदरगे,दिपाली पाटील,वेदिका दांडीमे,विनयख नळेगावकर,प्रज्ञाताई चनागिरे,उज्वला बरूरे तसेच परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
