राजमाता काॅलनी व शिक्षक कॉलनीच्या वतीने शिक्षकदिन उत्साहात साजरा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नागापूर येथील राजमाता काॅलनी व शिक्षक कॉलनी गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रेषित महंमद पैगंबर व राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंती निमित्त ईद-ए-मिलाद व शिक्षकदिन साजरा करण्यात आला.

यावेळी दादासाहेब रुपवते विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील तंत्रस्नेही संघर्ष साळवे यांना अहिल्यानगर महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी संजय ऊमाप यांच्या हस्ते मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.यावेळी श्री.संघर्ष साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना उपरोक्त दोन्ही कॉलनीचे आभार मानून गणेश मंडळांनी सामाजिक सलोखा जपावा असे आवाहन केले.

यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते साळवे क्लासेसच्या संचालिका सौ. भारती साळवे तसेच महेंद्र अविनाश कदम (उपशिक्षक,दादासाहेब रुपवते विद्यालय,अहिल्यानगर), मनिषा महेंद्र कदम – (मुख्याध्यापिका,सखाराम मेहेत्रे विद्यालय,अहिल्यानगर),श्रीमती कुसुम कदम (सेवानिवृत्त शिक्षिका ),श्री.मुस्तकीम पठाण ( श्रीमती मायादेवी अॅबट विद्यालय भिंगार,),श्री.विश्वनाथ कदम ( जिल्हा परिषद शाळा चेडगाव, तालुका राहुरी ) श्री. विशाल सूर्यवंशी ( श्रीमती मायादेवी अॅबट विद्यालय भिंगार), श्रीमती पवार मॅडम, श्रीमती चटर्जी मॅडम( प्रशिक्षक कराळे हेल्थ क्लब) यांचाही शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक पुढारीचे संपादक श्री. पुरुषोत्तम सांगळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दिलीपराव लेकुरवाळे, प्रगतशील शेतकरी श्री.बाबा आढाव,श्रीमती.योगिता बाकले, श्रीमती.अर्पिता कांबळे शहा (आरव क्रिएशन),सौ. छाया महाजन,सौ.योगिता फुंदे,सौ. मयुरी सोनवणे,सौ.सविता सांगळे (जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर),श्रीमती.अश्विनी चव्हाण,सौ.पूजा बाचकर, श्रीमती.पितळे ताई,श्रीमती. सुवर्णा डूबे (प्रेरणा ब्युटी पार्लर ), श्री राजू आडबल्ले,श्री.छिंदम, श्री.बापू सोनवणे,श्री.अक्षय गांधी,श्री.राजाभाऊ मोहिते,श्री. नारखेडे,श्री.दिलीप दरंदले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री.मोहसीन ढगे तसेच पदाधिकारी संदेश शिरसाठ,किशोर गरजे,श्री. अमोल कणसे,श्री.ईश्वर जायभाय,श्री. प्रवीण कर्डिले, सागर भिसे आदींनी परिश्रम घेतले.