भिंगार कॅम्प स्टेशन हद्दीत घरफोडीत चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल फिर्यादीस सुपूर्त फिर्यादींच्या डोळ्यात आनंदाश्रू
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीतील चोरीस गेलेला मुद्देमाल पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे हस्ते फिर्यादीस सुपुर्त करण्यात आले.दि.13/03/2025 रोजी सायंकाळी रोजी रात्री 08/00 वाचे सुमारास फिर्यादी नामे अंजली संतोष अडिवळे (रा. येवलेनगर,सारसनगर, अहिल्यानगर) यांचे राहते घराचे कुलूप डुब्लीकेट चावीने उघडुन सोन्याचे दागिने चोरी झाले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती.त्यावरुन कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 209/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305, 331(3), 331(4), 3(5) प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक विश्लेषनाद्वारे निष्पन्न आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले 2,61,990 रुपये किमतीचे 83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते.तसेच दि.03/07/2025 रोजी गणेश कॉलनी,सारसनगर, अहिल्यानगर येथे बंद घराचे कुलूप तोडुन लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झालेबाबत फिर्यादी नामे केवळकुमार भगवानदास गांधी (रा. सारसनगर,अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कॅम्प पो.स्टे गु.र.नं.379/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305, 331(3), 317(5) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन 8,40,000/- रु किमतीची 120 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड हस्तगत करुन दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्याचे दागिने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर यांचे हस्ते फिर्यादी यांना सुपुर्त करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने नगर शहर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक.जगदीश मुलगीर, पोसई.गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार संदिप घोडके,दिपक शिंदे,रवि टकले,रेखा पुंड,प्रमोद लहारे,विठ्ठल राठोड यांनी केली आहे.
