खूनाच्या गुन्ह्यात तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अखेर एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तब्बल एक वर्षापासून खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी तपास करत सीताफीने पकडले आहे.दि.०४/०७/२०२४ रोजी फिर्यादी नामे शालिका रमेश चव्हाण (वय-३० वर्ष रा.पांगरमल ता.जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की,दि. ०४/०७/२०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान पांगरमल ग्रामपंचयाती समोर आरोपी नामे १)महादेव आव्हाड २)सरंपच आमोल आव्हाड २)उध्दव महादेव आव्हाड ४)अजिनाथ महादेव आव्हाड ५)गणेश आंबादास आव्हाड ६)संदीप पंढरीनाथ आव्हाड व इतर २० ते २५ अनोळखी इसमांनी गैरकायदयाची मंडळी जमवून त्यांचे हातात कु-हाडी कोयते व लाकडी दांडके घेवून फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा रामलाल रमेश चव्हाण दिर चांगदेव नामदेव चव्हाण व पकडलेला इसम असे पांगरमल गावातील शेळयांची चोरी करतो असे बोलून चौघांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांने मारहाण करुन फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा व पकडलेले इसमास जखमी करुन फिर्यादीचा दिर चांगदेव नामदेव चव्हाण (वय-२५ वर्ष रा.पखोरा ता. गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर) याला जिवंत ठार मारले आहे तसेच उध्दव आव्हाड व इतर अनोळखी इसमाने फिर्यादीचे कपडे फाडुन त्यांना लज्जा उत्पन्न केली व आरोपीतांनी पारधी समाजावर घाणघाण जातीवाचक शिवीगाळ करुन जिवंत ठार मारण्याची धमकी दिली तसेच मोटारसायकलचे नुकसान केले व जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले वैगरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरजि.५४२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२),२९९ (२) १९९ (३), १९०,१०३(१), १३०(२),११८ (१), ११५(२), ७४,३५२,३५१ (२), ३२४ (४) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारी २०१५ चे कलम ३ (१), (आर) (एस) ३ (२), (व्हि-९), ३(२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयात यापुर्वी आरोपी नामे १)महादेव किसन आव्हाड २)अमोल भारत आव्हाड ३)उध्दव माहेदव आव्हाड ४)गणेश आंबादास आव्हाड ५)संदीप पंढरीनाथ आव्हाड ६)अक्षय आंबादास आव्हाड ७)आकाश अशोक वाकडे सर्व राहणार पांगरमल ता जि अहिल्यानगर यांना अटक केली आहे.सदर गुन्हयात आरोपी नामे आजिनाथ महादेव आव्हाड (रा.पांगरमल) हा गुन्हा घडलेपासुन फरार होता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक बी.चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर फरार आरोपी हा पांगरमल या ठिकाणी आहे त्यावेळी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता गुन्हे तपास पथकाचे अंमलदार यांना रवाना केले.पांगरमल या ठिकाणी जावुन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आला. सदर ओरापीस एमआयडीसी पोस्टे गु. रजि.५४२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२)१९१ (२) १९१ (३), १९०,१०३(१), १३०(२),११८ (१), ११५(२), ७४.३५२,३५१(२), ३२४ (४) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारी २०१५ चे कलम ३ (१), (आर) (एस) ३(२), (व्हि-९),३२(२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक केली असुन पुढील तपास श्री.शिरीष बमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी.चौधरी,पोसई.मनोज मोंढे,सफो.राकेश खेडकर, पोहेकॉ.राजु सुद्रीक,पोहेकॉ. संदीप पवार,पोहेकॉ.सचिन आडबल,पोकॉ.किशोर जाधव, पोकॉ.नवनाथ दहिफळे,पोकॉ. सुरज देशमुख,पोकॉ.ज्ञानेश्वर आघाव तसेच उपाविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगरचे पोकॉ. निखील मुरुमकर,पोकॉ.सचिन वीर,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.
