क्रांतीज्योती प्रतिष्ठानच्या वतीने कबड्डीचे सामने संपन्न;न्यू बजरंग स्पोर्टिंग क्लबला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-नुकतेच देवळी येथील क्रांतीज्योती प्रतिष्ठान देवळीच्या वतीने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात परिसरातील ३२ संघ सहभागी झाले होते.स्पर्धेचे उदघाटन राजश्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आशाबाई सुरकार,अशोक राऊत,गौतम पोपटकर,प्रवीण कात्रे,अजिंक्य तांबेकर,रमेशराव कळसकर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सलग तीन दिवस अतितटीच्या चाललेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार २१,००० रु रोख न्यू बजरंग स्पोर्टिंग क्लब वर्धा यांनी पटकावला तर द्वितीय पुरस्कार स्वरा सेवन स्पोर्टिंग क्लब वरूड यांना १५,००० रु रोख मिळाला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी जय गुरुदेव क्रीडा मंडळ सोनेगाव बाई व श्री संतकृपा क्रीडा मंडळ पळसगाव बाई यांनी प्राप्त केला.स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री. राजेशजी बकाने यांचे हस्ते पार पडले यावेळी शोभाताई तडस,नरेंद्रजी मदनकर,नंदूजी वैद्य,जब्बारभाई तंवर, मोहनबाबू अग्रवाल,हेमंत जावंदिया यांची उपस्तिथी होती.यावेळी देवळीतील काही समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रमुख्याने रमेशराव कळसकर, आशाबाई सुरकर,मिलिंद देशमुख,धनराज धोके व नारायणराव ढाकुलकर यांचा शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी अयोजनाकरिता मंडळाचे अध्यक्ष गौरव खोपाळ व इतर सदस्य पंकज ठाकरे,तेजस खोपाळ,अमोल कळसकर,अक्षय ठाकरे,कुणाल खोपाळ,अविनाश कळसकर,श्यामभाऊ रुद्रकार,नितीन खोपाळ,प्रवीण खोपाळ,सुरज मेश्राम,दिपकराव खोपाळ, प्रभाकरराव खोपाळ,भूषण कळसकर,पंकज खोपाळ,अमर खोपाळ, प्रशांत खोपाळ,श्रीकांत खोपाळ,विकास खोपाळ, आदित्य खोपाळ, मोहित खोपाळ,विक्की खंडाळे, शुभम मोरणकर,शिवराम रेवडे इत्यादींनी परिश्रम घेतले.