तुळजापुर व नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालय येथे त्वरीत “डायलेसीस विभाग ” सुरु करा आम आदमी पार्टीची मागणी
नळदुर्ग प्रतिनिधी(अजित चव्हाण):-आम आदमी पार्टी तुळजापूर व नळदुर्ग शहरच्या वतीने तुळजापुर व नळदुर्ग येथे त्वरीत डायलेसीस विभाग सुरु करावा या मागणीचे निवेदन जिल्हाशल्यचिकित्सक उस्मानाबाद यांना वैद्यकीय अधीक्षक तुळजापूर यांच्या माध्यमातून देण्यात आले. डायलेसीस विभाग तुळजापुर येथे सुरु झाल्यास तुळजापुर व सलग्न नळदुर्ग व तालुक्यातील गावातील किडनीचा आजार असणाऱ्या व डायलेसिस करणाऱ्या रुग्णाना यांचा लाभ होईल त्यामुळे रुग्णांना रोटीन डायलेसीस करिता इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे रुग्ण नातेवाईक यांना होणारा नाहक त्रास व आर्थिक भुर्दड काही अंशी कमी होईल.NRHM च्या माध्यमातून मार्च २०२२ मध्ये डायलेसीस तंत्रज्ञ पद भरले असून अद्याप डायलेसीस विभाग सुरू झाला नाही तरी डायलेसीस विभाग त्वरीत सुरु करण्यात यावे त्यामुळे तुळजापुर तालुक्यातील किडणीचा आजार असणाऱ्या व डायलेसीस करणाऱ्या रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.सदरील निवेदन तुळजापूर व नळदुर्ग शहर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर शेळके व नळदुर्ग शहर अध्यक्ष वसीम पठाण शहर सचिव अझहर शेख आणि तालुका संघटक मजीद इनामदार यांच्या नेतृत्वात देण्यात आले.मागणी त्वरीत पूर्ण न झाल्यास रुग्णांच्या हितासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.सदरील निवेदन प्रत माहितीस्तव संचालक आरोग्य सेवा पुणे, उपसंचालक आरोग्य परिमंडळ लातुर जिल्हाधिकारी उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आली आहे.