जिल्ह्यात अवैध वाळू चोरी वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई;८ वाहनासह १५ जणांवर गुन्हे दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहर व तालुका हद्दीत अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाई करुन ३६,९९,००० /- रु. ( छत्तीस लाख नव्यान्नव हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/ शंकर चौधरी,राहुल सोळुंके,पोकॉ/रणजीत जाधव,जालिंदर माने अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणारे ०२ ठिकाणी छापे टाकुन एकुण ३६,९९,००० /- रुपये किंमतीचे एक सिल्व्हर व एक पांढरे रंगाची झेनॉन,एक सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली, तीन विटकरी,एक लाल व एक हिरवे रंगाचा टेम्पो अशी एकुण ८ वाहने व त्यामध्ये एकुण १० ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन १५ आरोपीं विरुध्द श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन येथे भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये एकुण २ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.ते खालील प्रमाणे
श्रीरामपूर तालुका ८८/२३ भादविक ३७९, ३४ सह पकाक. ३/१५
आरोपीचे नाव व पत्ता
१)विशाल गोरख धनवटे वय २१,रा.रामपुर,ता.श्रीरामपूर
२)सागर कारभारी थोरात वय २७,रा.पुणतांबा,ता.राहाता
३)नंदू नारायण कोठुळे वय 29 रा.संजय नगर श्रीरामपूर
४) रवींद्र काशिनाथ कदम वय 33 रा.गोंडेगाव ता श्रीरामपूर
३२,८९,०००/- सात विविध कंपनीची वाहने व एक (९) ब्रास
इतर ९ फरार आरोपी
श्रीरामपूर शहर १३५ / २३ भादविक ३७९,३४ सह पकाक.३/१५
१)रोहित मायकल रणनवरे वय २२,रा.काळे गल्ली बेलापुर,श्रीरामपूर एक फरार
मुद्देमाल ४१००००/- एक झेनॉन गाडी व एक (०१) ब्रास वाळु
२.एकुण
०५ आरोपी ताब्यात घेतले व १० आरोपी फरार
३६,९९,०००/- रुपये किंमतीचे एक सिल्व्हर व एक पांढरे रंगाची झेनॉन,एक सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली, तीन विटकरी,एक लाल व एक हिरंवे रंगाचा टेम्पो अशी एकुण ८ वाहने व त्यामध्ये एकुण १० ब्रास वाळु,सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके,उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.