चॉपरने वार करून लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१० फेब्रुवारी):-पुणतांबा श्रीरामपूर रोडवर ऍ़मेझॉन कंपनीचे डिलीव्हरी बॉयला आडवुन चॉपरने वार करुन लुटणारी सात (07) जणांची टोळी 33,100/- (तेहतीस हजार शंभर) रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/02/2023 रोजी फिर्यादी श्री.शुभम शांतीलाल चोरडीया (वय 26,धंदा ऍ़मेझॉन फिलीप कार्ड डिलीव्हरी बॉय,रा.वॉर्ड नं.7, ता.श्रीरामपूर) हे पुणतांबा ते श्रीरामपूर रस्त्याने मोटार सायकलवर जात असताना पाठीमागुन मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी तीन इसमांपैकी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या एका इसमाने फिर्यादीचे मोटार सायकलला लाथ मारुन धक्का देवुन खाली पाडुन चॉपर सारख्या धारदार हत्याराने डोक्यावर मारुन जखमी करुन खिशातील 15,000/- रुपये रोख, 18,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल व डिलीव्हरी बॅग हिसकावुन एकुण 33,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढुन घेतला आहे.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी राहाता पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. 66/2023 भादविक 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री.राकेश ओला,पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा,यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समातंर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी,बापुसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,भिमराज खर्से, विशाल दळवी,दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, रविंद्र घुंगासे,मयुर गायकवाड, रणजीत जाधव,रोहित येमुल, सागर ससाणे,मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन घेवुन सदर ना उघड गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या व पथकास रवाना केले.पथक पुणतांबा व राहाता परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे ज्ञानेश्वर गांगुर्डे याने त्याचे 5 ते 6 साथीदारासह वर नमुद गुन्हा केला असुन ते सर्व शिर्डी रेल्वे स्टेशन परिसरात लपुन बसलेले आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर मिळाल्याने त्यावरुन पोनि/कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार बातमीतील नमुद ठिकाणी शिर्डी रेल्वे स्टेशन परिसरात संशयीत इसमांचा शोध घेत असताना काटवनात एका झाडाखाली काही इसम बसलेले दिसले.छापा टाकुन त्यांना ताब्यात घेण्याचे तयारीत असताना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले त्यांचा पाठलाग करुन सात (07) इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.तसेच एक इसम काटवनातील झुडपाचा फायदा घेवुन पळुन गेला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)ज्ञानेश्वर बाळासाहेब गांगुर्डे वय 22,रा. पिंपळवाडी,ता. राहाता 2) कार्तिक नारायण पांडे,वय 21, रा.सिंगपुर,ता.भदोनी, राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. शिर्डी,ता.राहाता 3)साईनाथ गोरक्षनाथ पाचरणे, वय 19, रा.राजगुरुनगर बिरोबा रोड, शिर्डी,ता.राहाता 4)शुभम कांतीलाल माळी,वय 19 रा. व्दारकानगर,बिरोबा रोड, शिर्डी,ता.राहाता 5)प्रशांत नारायण सोनवणे,वय 19,रा. शिंगवे रोड,पिंपळवाडी,ता. राहाता असे असल्याचे सांगितले.तसेच त्यांचे ताब्यात घेतले इतर दोन साथीदार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडती मध्ये गुन्ह्यात चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल,रोख रक्कम,एक चॉपर व ऍ़मेझॉन कंपनीचे डिलेव्हरी सामान असा एकुण 33,100/- रुपये किंमतीचे मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन राहाता पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई राहाता पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे सुरज पंडीत सोनवणे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारी व जबरी चोरीचे एकुण -02 गुन्हे दाखल आहे तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. शिर्डी 357/2021 भादविक 399, 402
2. राहाता 66/2023 भादविक 394, 34
आरोपी नामे साईनाथ गोरक्षनाथ पाचारणे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी व मोटर वाहन कायद्यान्वये एकुण -02 गुन्हे दाखल आहे तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर शहर 788/2021 मोवाकाक 188, 269
2. राहाता 66/2023 भादविक 394, 34
सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर,श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.