Maharashtra247

राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ सुरू करा-राहुरी आरपीआय (आ) तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

 

राहुरी प्रतिनिधी (दि.९ फेब्रुवारी):-सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न,शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ सुरु करावेत अशी मागणी रमाई बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या राहुरी तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे यांनी केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात सांगळे यांनी म्हंटले आहे की,जिल्ह्यातील नागरिकांनी प्रलंबित प्रश्न कामे तातडीने सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात त्यांचे लेखी अर्ज,निवेदन सादर करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत जिल्हा स्तरावर करण्यात आले आहे. मात्र गाव-खेड्यांतील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करणे शक्य नाही.त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक तान व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.सामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रत्येक तहसील कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करून या कक्षामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून तहसीलदार अथवा नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.तसेच नेमणूक केलेल्या विशेष कार्य अधिकारी यांचेमार्फत नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, कामे तातडीने सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात त्यांचे लेखी अर्ज,निवेदन यांचा स्वीकार करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत त्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सांगळे यांनी केली आहे.यावेळी निवेदन देण्यासाठी अध्यक्ष स्नेहल सांगळे,सचिव सुरेंद्र सांगळे, प्रियंका सगळगिळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page