जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे आमदार रोहित पवार
अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ फेब्रुवारी):-नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे,अशी आग्रही मागणी करतानाच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती रथयात्रेच्या आपण सोबतच आहोत, अशी भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता चोंडीहून नामांतर रथयात्रेस श्री परमपूज्य खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरांदे महाराज श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान पट्टणकलोडी जि. कोल्हापूर येथील मुख्य मानकरी व भाकणूककार यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोठे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. रथयात्रेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने विजय तमनर, सचिन डफळ,निशांत दातीर,राजेंद्र तागड,अक्षय भांड, दत्तात्रय खेडेकर,अशोक होनमाने,विनोद पाचरणे,संदीप भांड आदी यावेळी उपस्थित होते.नामांतर रथयात्रा ९ फेब्रुवारी २०२३ चोंडी येथून कर्जत, श्रीगोंदा,येथे मुक्कामी आहे. पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात केली ही मागणी कोणा एकाची नसून सर्वांनी अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या इतकी कार्यकुशलता असलेली व्यक्तिमत्व नाही.पुढील काळात ही मागणी विधान परिषदेत आली तर आपण नक्कीच सहभागी होणार आहे. तसेच चोंडी येथिल विकास कामांना प्राधान्य देत 09 कोटी रुपयांची नव्याने कामे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजी होणाऱ्या जयंती साजरी करण्यापूर्वी नामांतर झाले नाही तर कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे कृती समितीच्या वतीने इशारा देण्यात आला.आगामी अधिवेशनदरम्यान हा विषय मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.