नळदुर्ग प्रतिनिधी(अजित चव्हाण):-पोरागड हे संत सेवालाल महाराजाची पावण भूमी आहे .बंजारा समाजाचे प्रश्न अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे प्रयत्न पोरहादेवी येथील आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार असून बंजारा बांधवांनी पांढऱ्या झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. कॅबिनेट मंत्री संजय राठोड हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते.12 फेब्रुवारी 2023 रोजी पोहरादेवी येथे सेवाध्वज स्थापना व संत सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि पोहरा उमरी तीर्थक्षेत्र व वनोद्यानाच्या एकूण 593 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने बंजारा बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.या पूर्व तयारी सभेसाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर कॅबिनेट मंत्री संजय राठोड आले असता नळदुर्ग येथील आयोजित कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्हा बंजारा बांधवांच्या वतीने येथोचित जंगी सन्मान करण्यात आला.व्यासपीठावर जिल्हापरिषद सदस्य प्रकाश चव्हाण,माजी नगरसेविका छमाबाई राठोड, गुलाब भाऊ जाधव,लक्ष्मण चव्हाण,अमृता चव्हाण , संजय राठोड,राजु चव्हाण,डॉ.सुरज चव्हाण,गुलाब राठोड, योगेश राठोड, धोंडीराम पवार, प्रवीण पवार, हरीश जाधव, वैभव जाधव, लखण चव्हाण, सुरेश राठोड, सावंत पवार, कुमार राठोड,आनिल पवार , लक्ष्मण चव्हाण, रामजी राठोड, देविदास राठोड, संदीप राठोड, लाला राठोड, सुरेश काशिनाथ राठोड , दिनेश राठोड, बालाजी राठोड, रमेश राठोड, उमेश राठोड सुर्यकांत राठोड, सुशिलाबाई पवार , कस्तुराबाई राठोड, सह जिल्ह्यातील बंजारा बांधव महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
