जुने नायगाव शाळेतील शिक्षक संतोष वाघमोडे,सुजाता सोळसे यांना निरोप देतांना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर..शिक्षकांनी ६ वर्ष प्रेरणादायी व आदर्शवत काम करून जुने नायगाव शाळा व गावाचा नावलौकिक वाढविला-संजीवन दिवे शिक्षण विस्तार अधिकारी
नाऊर ( वार्ताहर ) कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नोकरदार वर्गाला बदली हा प्रशासकिय नियम असतोच, मात्र काही जण आपला वेगळाच ठसा उमटवून जातात याचाच प्रत्यय नुकताच श्रीरामपूर तालुक्यातील जुने नायगांव शाळेतील मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व श्रीमती सुजाता सोळसे यांना निरोप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थांना आला.भाषणावेळी प्रत्येक बालक विद्यार्थी व ग्रामस्थ धाय मोकळून रडत होते.एखादी मुलगी सासरी नांदायला निघाल्यावर जी अवस्था होते तीच अवस्था नायगावकरांची झाल्याचा अनुभव आला.तालुक्याच्या एक टोकाला असणारी दुर्गम भागातील दोन शिक्षकी शाळा असणाऱ्या येथील शाळेला विदयार्थ्यांना नुसते घडवले नाही तर शाळेला आय.एस.ओ.(।S0)मानांकनासह डिजीटल शाळा , मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात ३रा क्रमांक मिळवणारी शाळा ठरली.

या शाळेच्या विकासात तन मन धनाने कार्य करणाऱ्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना सर्वांनाच गहिवरून आले.कारण या शिक्षकांनी विद्यार्थी हेच दैवत व स्वतःची मुले समजून काम केले.कार्यक्रमात दोन्ही शिक्षकांना नायगाव भूषण पुरस्काराने सन्मानित करून सुंदर मानपत्र प्रदान करण्यात आले.शाळेतील विद्यार्थी गेल्या सहा वर्षात अनेक स्पर्धेत चमकली तसेच या शिक्षकांमुळे शाळा व गावाचा नावलौकिक वाढला.या शाळेत या दोही शिक्षकांनी विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविले.स्थापनेपासून प्रथमच या शिक्षकांनी वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात केली.पहिल्या वर्षी ८०,०००/-,दुसऱ्या वर्षी ७७०००/-,तिसऱ्या वर्षी १,०७०००/-इतका निधी जमा होऊन खर्च वजा जात शिल्लक रक्कमेतून शाळेचा भौतिक व सर्वागीण विकास घडविला.आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणून टिकवली.

संपूर्ण गावान याची जाणीव ठेवून निरोपाचा भव्य कार्यक्रम ठेवला.सलग चार तास सर्वांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा होत्या.विद्यार्थी व पालक मनोगत व्यक्त करताना ढसाढसा रडत होते..आणि हा कार्यक्रम एस न्यूज चॅनेल लाइव्ह असल्याने ज्यांनी ज्यांनी लाईव्ह पाहिला ते सुद्धा रडले..यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक शाकीर शेख व रेहाना मुजावर यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ ग्रामस्थ संपतनाना लांडे हे होते.तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे,केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर,अशोक विटनोर,वाघुजी पटारे,सरपंच डॉ. राजाराम राशिनकर,उपसरपंच पुष्पाताई लांडे,माजी उपसरपंच मिनाताई चंद्रसेन लांडे,गोविंद दातीर,विठ्ठल बोरुडे,सुभाष बोर्डे,निमगाव खैरीचे सरपंच दत्तात्रय झुराळे,सुभाष लांडे,पोलिस पाटील राजेंद्र राशिनकर,देऊळगाव सिद्धी चे उपसरपंच रमेश कुंडकर,नामदेव वाघमोडे,कुलदीप सोळसे,सुनिल मार्तंड लांडे,सुनिल प्रकाश लांडे,किशोर आढाव,लहानु लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे,उपाध्यक्ष अशोक वाघ,माजी अध्यक्ष जालिंदर राशिनकर,मनिषा राशिनकर,संतोष राशिनकर,किरणकुमार लांडे,किरण दातीर,रविंद्र दरेकर,दिपक राशिनकर, गोरख राशिनकर,डॉ.संदीप लांडे,शामसुंदर लांडे, सागर लहारे ,शिवाजी लहारे,महेश राशिनकर,रामप्रसाद दातीर,सुरेश राशिनकर,सुनिल दातीर,सतीश लांडे,ॲड.संदीप लांडे,दिगंबर लांडे,विक्रम भुसारी,सचिन भुसारी,सतीश जोशी,प्रदिप लांडे,यशवंत लांडे,प्रविण बोर्डे,अविनाश लांडे,सचिन लांडे,प्रताप लांडे, संजय राशिनकर,माजी उपाध्यक्षा पूजा लांडे,मिताली दातीर,इंदुबाई लांडे आदींनी परिश्रम व सुंदर नियोजन करून सर्व पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणला.यावेळी विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी संतोष वाघमोडे व सुजाता सोळसे या शिक्षकांनी या शाळेत प्रेरणादायी,आदर्शवत व अविस्मरणीय काम करून संपूर्ण गावाला जिंकल अशा भावना व्यक्त केल्या.जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर यांनी ऑनलाईन माध्यमातून तसेच कार्यक्रमात किरण दातीर,किरणकुमार लांडे,सुभाष बोर्डे,संजय वाघमोडे यांनी दोन्ही शिक्षकांच्या बदलीनिमित्त मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करून हळहळ व्यक्त केली.विद्यार्थी वेदांत भुसारी,आरोही दातीर,रुद्र लहारे,कैवल्य दरेकर,आर्या व शौर्या लहारे,वेद नजन,प्रिती लांडे,माजी विद्यार्थी दिक्षा ढवळे,कृष्णा लांडे यांना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.शिक्षक संतोष वाघमोडे व सुजाता सोळसे यांनी ६ वर्षात शाळेचा सर्वांगीण विकास घडविल्याने कृतज्ञता भावनेतून ग्रामस्थांनी निरोपाचा भव्य कार्यक्रम ठेवल्याबद्दल ऋण व्यक्त केले.अत्यंत जड अंतःकरणाने शाळा व गाव सोडून जावे लागत असल्याच्या भावना व्यक्त करताना दोन्ही शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ओहळ यांनी केले.
दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांची नेहमीची गरज लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वही,पेन व शिस्पेन्सिल चे वाटप केले.तसेच शाळेस परिपाठ हे पुस्तक भेट दिले.स्वच्छ सुंदर शाळेच्या बक्षिसातून शाळेस एक संगणक संच व इन्वर्टर,बॅटरी मान्यवरांच्या हस्ते शाळेस सुपुर्त करण्यात आले.यावेळी चंद्रसेन लांडे,रामचंद्र लांडे,नामदेव राशिनकर,माधव राशिनकर,बापूसाहेब लांडे,चंद्रहंस लांडे,चंद्रकांत दातीर,मच्छिंद लांडे,गोरक्षनाथ ढवळे,राजेंद्र बुचुडे,वसंत लांडे,भास्कर बोर्डे,बाळासाहेब बोर्डे,अंकुश गायकवाड,माधव राशिनकर,अरुण राशिनकर,चांगदेव राशिनकर,केशव नजन,बाजीराव भुसारी,विवेक लांडे,दोन्ही शिक्षकांचे नातेवाईक व मित्र परिवार,गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक,माता भगिनी,तरुण मित्र मंडळ,माजी विद्यार्थी नायगाव जुने मधील सर्व ग्रामस्थ घरे बंद करून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी किरण दातीर यांनी सर्वांचे आभार मानले.
