हिंदी राष्ट्रभाषेचा गौरव : स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरशालेय हिंदी निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-हिंदी राष्ट्रभाषेचा गौरव करत स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या सप्ताहात इयत्ता एलकेजी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कविता,गायन, नाट्यप्रयोग,प्रश्नमंजुषा अशा विविध कलाकृती सादर करून हिंदी भाषेचा सन्मान केला.या दरम्यान शाळेतर्फे श्री.सदाशिव दत्तात्रय शुक्रे आंतरशालेय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील तब्बल 150 विद्यार्थी सहभागी झाले.दि.27 सप्टेंबर रोजी शाळेत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.विजेत्यांना अनुक्रमे रु.1000, रु.750, रु. 500 आणि रु. 300 रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
लहान गटातील विजेते (इयत्ता पाचवी ते सातवी):
प्रथम-तनिष्का नवनाथ शिंदे (हनुमान विद्यालय, टाकळी खातगाव)
द्वितीय-आराध्या निलेश लोंढे (सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल)
तृतीय-शुभ्रा गोपीनाथ होले (अशोक भाऊ फिरोदिया हायस्कूल)
उत्तेजनार्थ-अनुष्का राजू रोडे (कार्मेल इंग्लिश मीडियम स्कूल)
मोठ्या गटातील विजेते (इयत्ता आठवी ते दहावी):
प्रथम : सौम्या जाधव (कर्नल परब गुरुकुल शाळा)
द्वितीय : सानिका निलेश काळभोर (लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय)
तृतीय : अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम)
उत्तेजनार्थ : सिद्धी संतोष झळके (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल)
या स्पर्धेचे परीक्षण अहमदनगर कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. ऋचा शर्मा आणि रेसिडेन्शिअल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मुक्ता कांडेकर यांनी केले.कार्यक्रमास नगर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अशोक मुरलीधर घोरपडे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ध्येय विद्यार्थी दशेत असतानाच निश्चित करा. शिक्षक व पालकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्या आणि मेहनतीची जोड द्या.” तसेच स्नेहालय परिवाराचे विश्वस्थ श्री. संजय बंदिष्टी यांनी हिंदी साहित्याचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक वाचन करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक हनीफ शेख, मानद संचालक श्री.राजीव गुजर, प्राचार्या सौ.जयश्री खरात, पीआरओ टीम व चाईल्डलाईनचे श्री.शाहिद शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनीफ शेख यांनी केले.सूत्रसंचालन सौ. शबाना शेख व यास्मिन सय्यद यांनी केले तर शेवटी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.अहिल्यानगरमधील विविध शाळांतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदी सप्ताह उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.