पाटेवाडीतील घटनेनंतर सुजातदादा आंबेडकर यांची पीडित कुटुंबास भेट..घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी
अहिल्यानगर/कर्जत:-पाटेवाडी (ता. कर्जत) येथे आदिवासी समाजातील महिलेच्या अंत्यविधीला गावातील काही गुंडांनी विरोध केल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी आज (दि.२९ सप्टेंबर २०२५) पाटेवाडी येथे जाऊन कै.बेबी सैनाशा पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले व धीर दिला.
यावेळी बोलताना सुजातदादा आंबेडकर म्हणाले, “गावगुंडांनी केलेली ही कृत्ये अमानुष आहेत. तुम्ही घाबरून जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलिस प्रशासनाशी चर्चा करू.” यानंतर त्यांनी पाटेवाडी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. “आपण सर्वजण एक आहोत, जातीभेद विसरून सलोखा राखणे गरजेचे आहे. समानतेच्या भावनेनेच समाज प्रगत होईल,” असा संदेश त्यांनी ग्रामस्थांना दिला. या वेळी सुजातदादा आंबेडकर यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा सल्लागार जे. डी. शिरसाठ, शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर महासचिव प्रवीण ओरे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, युवा जिल्हा संघटक रुपेश काळेवाघ, अमोल उघडे, अतिशदादा पारवे (जामखेड तालुकाध्यक्ष), पोपट शेटे (कर्जत तालुकाध्यक्ष), संजय शेलार, लखन पारसे, दत्ता भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच ग्रामस्थांपैकी नामदेव बंडगर (तंटामुक्ती अध्यक्ष), झुंबर राजगुरू (सरपंच), योगेश राजे भोसले (उपसरपंच), संतोष (बापू) भोसले (माजी सरपंच), ठकाजी कदम, औदुंबर निंबाळकर, दादा दिसले, तुकाराम कदम (ग्रामपंचायत सदस्य), राहुल घोडके (ग्रामसचिव), बापू क्षीरसागर, उमाताई जाधव, संतोष चव्हाण, वैजीनाथ केसकर, गणेश ससाणे, किशोर ससाणे, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, तुकाराम पवार, ललिता पवार, राहुल पवार, दिसेना पवार, मनीष ससाणे, अविनाश काळे, रंगीशा काळे, रवी काळे, हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या घटनेमुळे सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
