उस्मानाबाद प्रतिनिधी(अजित चव्हाण) (दि.४ डिसेंबर):-नळदुर्ग-गोलाई-ते-अक्कलकोट रोड पर्यंत करण्यात आलेल्या महामार्गावर दोन्ही बाजूस सर्व्हिस रस्ता गरजेचे असताना तो केलेला नाही.शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या दोन वर्षापासून सातत्याने महामार्गाबाबत विविध उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे.त्यात गोलाई ते बसस्थानक पर्यंत हायमस्ट लैंप,स्ट्रीट लाईट सदर कामासाठी नगर पालिकेने देखभाल व दुरुस्तीचे हमीपत्र दिले आहे.महामार्ग व सर्व्हिस रस्ता दरम्यान सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा करने,दोन्ही ही बाजुचे सर्व्हिस रस्ते,बसस्थानक समोर जंक्शन, गोलाई सर्कलचे सुशोभिकरण, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक,नालीचे काम तात्काळ पूर्ण करने, एस.बी.आय.बँकेसमोरील विद्युत डीपी हटवीने, असे अनेक विषय गेल्या दोन वर्षापासून मांडत आहोत. परंतु संबंधित विभाग,ठेकेदार कंपनी, टीम लीडर यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना या उपाययोजना नसल्याने नाहक त्रास होत आहे. या मागण्यासाठी मनसेच्या वतीने वारंवार निवेदने, व निदर्शने आंदोलन केले. पण संबंधित विभाग व प्रशासन ढिम्म असल्याचे दिसत आहे. म्हणून वरील मागण्या संदर्भात येत्या १५ दिवसात काम सुरु न झाल्यास आम्ही यापुढे औरंगाबाद येथील खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याबाबतचे निवेदन, मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख यांनी संबंधित विभागाला दिले. त्याची प्रत माहितीस्तव केंद्रीय मंत्री, नितिन गडकरी, उस्मानाबाद जिल्हाधिकारी,यांच्याकडे रवाना केली आहे.