Maharashtra247

फायनान्स कंपनीच्या कर्जदारावर गोळीबार बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.४.डिसेंबर):-फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून कर्जदार व वसुली एजंट यांच्यात बाचाबाची झाली असून यात अक्षय अर्जुन औटी (रा.सरदवाडी,ता.शिरूर) यांच्यावर दोघांनी गोळीबार केला.मात्र सुदैवाने अक्षय औटी हे या गोळीबारात बचावले.ही घटना नगर पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे शुक्रवारी (दि.२ डिसेंबर) रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.अक्षय औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत संतोष महामुनी (रा.बाबूरावनगर,ता.शिरूर, जि.पुणे),संकेत सुरवसे (रा. सरदवाडी,ता.शिरूर,जि.पुणे) या दोघां विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यातील फिर्यादीने एका फायनान्स कंपनीकड़न वाहन क्रमांक एमएच १२ एसई ७५५७ साठी कर्ज घेतले होते.यातील आरोपी संकेत महामुनी हा फायनान्स कंपनीत कर्ज वसुलीचे काम करतो.फिर्यादीच्या वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकले होते.त्या कारणावरून फिर्यादी व संकेत महामुनी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते.फिर्यादी हे मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून त्यांच्या चारचाकी वाहनातून घरी चालले होते.त्यावेळी यातील आरोपींनी फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलामधून फायरिंग केली.मात्र फिर्यादी अक्षय औटी बालंबाल बचावले,असे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे करीत आहेत.

You cannot copy content of this page