वॉचमनला लोखंडी गजाने मारहाण करुन त्यांचा मोबाईल चोरणाऱ्यास संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केले जेरबंद
संगमनेर प्रतिनिधी (दि.३.डिसेंबर):-संगमनेर शहराजवळील राजेंद्र होंडा शोरुमचे पाठीमागील इमारतीच्या वॉचमनला लोखंडी गजाने जबर मारहाण करुन त्यांचा मोबाईल चोरी करणाऱ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून पाच महिन्यानंतर गजाआड केले आहे.दि.05/07/2022 रोजी फिर्यादी लक्ष्मण चांगदेव फटांगरे(रा.माझे घर सोसायटी,फुलेवाडी ता.संगमनेर) हे राजेंद्र होंडा शोरूमचे पाठिमागे नवीन काम चालु असलेल्या ठिकाणी ते व त्यांचा जोडीदार असे वाचमन म्हणुन काम करत होते.दरम्यान रात्री 02.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे या बांधकामावरील स्टिल चोरी करण्यासाठी आले असता लोखंडी गजाचा आवाज झाल्याने कोण आहे असा आवाज लक्ष्मण फटांगरे यांनी दिला असता चोरट्यांनी त्यांच्या ठोक्यात लोखंडी गज मारत जबर मारहाण केली.यावेळी त्यांचे कडील मोबाईलही हिसकावून घेवून गेले.अशी फिर्याद संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दिली सदर फिर्यादीवरून गुन्हा रजि नं.530-2022 भा.द.वि. कलम 394 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रीक तपासावरून या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हा पाथर्डी येथे एका महिलेकडे असल्याबाबत माहिती मिळाली.सदर ठिकाणी पोलिसांनी जावुन या महिलेकडे विचारपुस केली असता सदरचा मोबाईल माझ्या भावाने वापरण्यासाठी दिला आहे असे सांगितले. यावरून पोलिसांनी तीचा भाऊ सदाशिव वय 23 वर्षे रा.घोटेकर मळा,संगमनेर यास ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग, शिर्डी अतिरीक्त कार्यभार संगमनेर विभाग तपास पथकातील पोना/आण्णासाहेब दातीर,पोकॉ/अमृत आढाव, पोकॉ/सुभाष बोडखे,पोकॉ/प्रमोद गाडेकर, नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,पोना/ फुरकान शेख,पोकॉ/प्रमोद जाधव ने सायबर सेल अप पो अधि कार्यालय यांनी केली आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बारकु जाणे,संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करत आहे.