धारदार तलवारीसह सराईत गुन्हेगार जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली पोलिसांनी धारदार तलवारीसह फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडून अटक केली आहे.आरोपी हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकांना दमदाटी करत फिरत होता.या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.दिनांक 20/11/2025 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की,आयुर्वेद कॉलेज ते काटवन खंडोबा जाणारे रोडवर,गाझीनगर चौक, येथे एक इसम हातात धारदार तलवार घेऊन लोकांना दमदाटी करत आहे.माहितीची खातरजमा होताच,पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचासह पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी नमूद ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि बातमीतील वर्णनानुसार तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.पोलिसांनी चौकशी केली असता त्या इसमाने त्याचे नाव सचिन हिम्मत अवचिते (रा. मांदळी तालुका कर्जत) असे सांगितले.आरोपीच्या अंगझडतीमध्ये, त्याने लपवून ठेवलेली अंदाजे 4000/- (चार हजार रुपये) किमतीची धारदार लोखंडी तलवार मिळून आली. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1060/2025 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकाँ/109 डी. बी. दौंड हे करत आहेत. सदरची
कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख,पोहेकॉ/दौंड,पोहेकॉ/ वसीम पठाण,पोहेकॉ/विशाल दळवी,पोहेकॉ/ विनोद बोरगे,नापोकॉ/वाचचौरे,सत्यम शिंदे,सचिन लोळगे,दत्तात्रय कोतकर,शिरिष तरटे,राम हंडाळ यांनी केली आहे.
