भारत पवार कामाचा माणूस…! हक्काचा आणि घरातला माणूस…!! प्रेमाचा माणूस…!!! जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरल्यानं पवारांवर अनेकांनी केला शुभेच्छांचा वर्षाव…!
अहिल्यानगर प्रतिनिधी:- कोणीही वैयक्तिक अथवा सामाजिक समस्या घेऊन आलं, की ती समस्या पूर्णपणे ऐकून घेत त्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती कशी सोडविता येईल, समस्या घेऊन आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान कसं येईल, यासाठी मनापासून प्रयत्न करणारा कामाचा माणूस, हक्काचा आणि घरातला माणूस, प्रेमाचा माणूस कोण, असं कोणी विचारलं तर लगेच एक नाव डोळ्यासमोर येतं आणि ते नाव म्हणजे भारत पवार. अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आणि नक्की लढा, आम्ही तुमच्या सोबतीला आहोत, काळजी करु नका, शंभर टक्के तुमचाच विजय होईल, असे धिराचे चार शब्द ऐकवत अनेकांनी भारत पवारांवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. रुग्णालयात अनेकांना खाटा मिळत नव्हते. रेमेडिसिवर या इंजेक्शनच्या किंमती इतक्या वाढवण्यात आल्या, की की त्या इंजेक्शनमध्ये औषधांऐवजी अमृत भरलं होतं की काय, अशी शंका त्यावेळी येत होती. अशा भयान परिस्थितीत कोराना झालेल्या रुग्णांचे अनेक नातेवाईक भारत पवारांकडे यायचे. या सर्वांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पवार हे सातत्याने प्रयत्न करत होते. बूथ हॉस्पिटल, सिविल हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांकडे पवार यांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू असायचा. त्यातून अनेकांना स्वतःच्या रुग्णाची योग्य ती काळजी घेता आली..
पत्रकारितेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातले अधिकाऱ्यांच्या झालेल्या ओळखीचा फायदा पवार यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पवार यांचा दांडगा जनसंपर्क आहे. याचा फायदा जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पवारांनी मोठ्या कुशलतेनं करून घेतला. कोणाच्या काळात अनेकांना बाहेर फिरण्याची बंदी होती. अशा परिस्थितीमध्ये पवार यांनी तृतीयपंथीयांसह अनेकांच्या घरी किराणा पोहोचविला. सामाजिक प्रश्नांची जाण असल्यानं आणि सरकारी यंत्रणेत ओळख असल्यानं जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीतल्या गणातल्या प्रश्नांची सोडवणूक पवार हे निश्चितच करतील, अशी अनेकांना खात्री आहे. त्यामुळेच पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात नक्की उतरावं, अशी अपेक्षा अहिल्यानगर तालुक्यातल्या अनेकांनी व्यक्त केली आहे. सुदैवानं काही राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत पवार यांच्या नावाची संभाव्य उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात भारत पवार नावाचं खणखणीत नाणं कशा पद्धतीनं ‘करिश्मा’ दाखवणार, हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.
