अहिल्यानगर महापालिकेचे प्रभागनिहाय मतदार चित्र स्पष्ट..१ ते १७ वार्ड मध्ये असतील इतके मतदार..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय मतदारसंख्येची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यंदा तब्बल ३ लाख ०७,००९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.वाढलेली मतदारसंख्या,बदललेली प्रभाग रचना आणि नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे.महापालिका क्षेत्रात एकूण 17 प्रभाग असून त्यातील प्रत्येक प्रभागाचा राजकीय प्रभाव, समाजरचना आणि गत निवडणुकांतील मतदानाचा कल वेगळा आहे.त्यामुळे या वेळी कोणत्या प्रभागातून कोणते पक्ष बळकट होतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वार्ड नंबर व मतदारसंख्या
वार्ड क्रमांक
1) 22,495
2 ) 21,098
3 ) 14,830
4 ) 19,251
5 ) 16,380
6 ) 15,840
7 ) 16516
8 ) 18,020
9 ) 18,254
10) 21,566
11 ) 20,161
12) 19,809
13) 15,845
14) 16,654
15) 15,249
16) 19,606
17) 15,435
एकूण मतदारसंख्या : 3,07,009
महापालिकेतील काही प्रभाग हे मतदानाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक मानले जातात. प्रभाग क्रमांक 1,2,10 आणि 11 मध्ये सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.नव्या मतदारांची मोठी भर, युवा वर्गाची सक्रीयता आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित निवडणुकीचा माहौल सर्व मिळून महापालिका निवडणूक 2025 अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे.रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता,करप्रश्न,भूसंपादन यांसारख्या मुद्द्यांवर मतदारांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक प्रभागातील स्थानिक समस्यांवर कोणती राजकीय बाजू ठोस भूमिका मांडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.प्रभागनिहाय मतदारसंख्या जाहीर होताच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.काही प्रभागांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर काही ठिकाणी विद्यमान नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.अहिल्यानगर महापालिकेतील वाढलेली मतदारसंख्या निवडणुकीचा संपूर्ण कल बदलू शकते. युवा मतदारांची सक्रिय भूमिका आणि महिलांच्या प्रमाणात झालेली वाढही निर्णायक ठरणार आहे.
