Maharashtra247

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू 

नेवासा प्रतिनिधी (दि.४ डिसेंबर):-पाचेगाव येथे विहिरीच्या कडेला झाड तोडत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोणेगाव शिवारात शनिवारी घडली.गणेश आण्णासाहेब दिघे (वय ३२,रा.गोणेगाव,ता. नेवासा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.गणेश दिघे हा शनिवारी (दि.३ डिसेंबर) रोजी सकाळी ११ च्या सुमारास विहिरीच्या कडेला झाड तोडत असताना पाय घसरून तो विहिरीत पडला. गणेशला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढल्यानंतर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.याप्रकरणी आण्णासाहेब दिघे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

You cannot copy content of this page