नगर,प्रतिनिधी. (दि.४.डिसेंबर):-अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज यांच्या मठात 07 डिसेंबर रोजी श्री.दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे.या कार्यक्रमाची रूपरेषा श्री.दत्त महाराजांचा अभिषेक ,सकाळी 7 ते 8 वा,महादत्तयाग यज्ञ सोहळा,पूर्णहोती,आरती,सकाळी 8 ते 11 वा,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाम यज्ञ सोहळा. सकाळी 11 ते 12 वा,श्री दत्त महाराजांची भिक्षा. दुपारी 12 वा,महाआरती 12.30 ते 1 वा,जय शंकर भजनी सेवा मंडळ यांची भजन संध्या, सारोळा कासार. दुपारी 1 ते 3 वा,श्रींचा पालखी सोहळादुपारी 3 ते 5 वा,हभप श्री.सिद्धनाथ राऊत महाराजांचे दत्त महाराज जन्मोत्सावर कीर्तन,सायंकाळी 4 ते 6 वा,श्री दत्त महाराजांचा जन्म सोहळा,सायंकाळी 6 वा,श्रींचा भव्यदिव्य महापालखी सोहळा,आतिषबाजी, पुष्पवृष्टी, सायंकाळी 6 ते 7 वा,सनी वाघेला यांची भजन संध्या सायंकाळी 7 ते 10 वा.अशी असेल अशी माहिती अशोक दादा जाधव यांनी दिली आहे.तसेच भाविकांसाठी दुपारी 1 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित केलेला आहे.तरी श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ.शिवाजीनगर ,केडगाव व समस्त सेवेकरी वृंद यांचकडून जास्तीत जास्त भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
