(प्रतिनिधी):-राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे.बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून विमानातील इतर काही जणांचा ही मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या.त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान,त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं व अपघात झाला.
