ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या समर्थ टकले याने पटकाविले गोल्ड मेडल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१२ फेब्रुवारी):-स्पोर्ट्स अकॅडमी व बारामती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित २९ वी ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या केडगाव येथील समर्थ टकले याने गोल्ड मेडल पटकाविले.समर्थच्या यशा पाठीमागे त्याचे प्रशिक्षक योगेश बिचीतकर यांचा मोठा वाटा आहे.कायम सराव करून घेणे वेगवेगळ्या ठिकाणी तायक्वांदो स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे असे प्रशिक्षक योगेश बीचीतकर सरांचे कायमच समर्थला मार्गदर्शन लाभलेले आहे आहे,असे मत समर्थचे वडील महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी व सध्या अहमदनगर मधील कोतवाली पोलीस ठाण्यात असलेले पोलिस कर्मचारी रवींद्र टकले यांनी यावेळी सांगितले.