Maharashtra247

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी महोत्सव सोहळा संपन्न

 

वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-श्री गुरुदेव सेवा आश्रम व्यसनमुक्ती प्रचार व प्रशिक्षण केंद्र मोहगाव ढोले तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे शनिवार दि.४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला शनिवार दि.४ फेब्रुवारी शनिवारी पाच ते साडेपाच या वेळात ग्रामसफाई कलश स्थापना सामुदायिक ध्यान ह.भ.प श्री भगवान जी भोयर महाराज कानगाव ग्रामगीतेवर मार्गदर्शन गुरुदेव सेवा भजन मंडळ महगाव ढोले यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.तसेच दि.5 फेब्रुवारी रोजी होम पूजा आरती,महिला मेळावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली सामूहिक प्रार्थना ह.भ.प श्री महाराज वनाडोंगरी संतकृपा वारकरी भजन मंडळ डीगडो यांचे कीर्तन ह.भ.प गजाननराव दिघडे गोपाल कृष्ण भजन मंडळ,मोहगाव ढोले रुक्मिणी भजन मंडळ, सोमवार दि.६ फेब्रुवारी दिंडी सोहळा दिंड्यांचे स्वागत ह.भ.प श्री वसंतरावजी पेठे महाराज दिग्रस आणि त्यांचा संच यांचे काल्याचे किर्तन अति आनंदात पार पडले. मोहगाव ढोले एक छोटेसे गाव असून सोमवारी हे गाव शेगाव नगरी बनले होते प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासमोर रांगोळी टाकून येणाऱ्या प्रत्येक दिंडीचे औक्षवंत करून आपल्या गावाची शोभा वाढवली या मोहगाव ढोले यांचे अभिनंदन मानालाही जागा नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या घरासमोर रांगोळी फुलांची सजावट करून गावात एक रम्य वातावरण निर्माण केले श्री वसंतरावजी पेठे महाराज यांनी काल्याचे किर्तन अति उत्तम केले पेठे महाराज कीर्तन करून व्यतिरिक्त बऱ्याचशा बिमारीचे डॉक्टर सुद्धा आहेत बीपी शुगर मुळव्याध अशा अनेक असंख्य बिमारीचे औषध त्यांच्याकडे उपलब्ध असतात वसंतरावजी पेठे महाराजांचे काल्याचे कीर्तनाच्या वेळी त्यांना नागरिकांनी साथ दिली हार्मोनियम वादक सुरेश सुर जसे तबलावादक निखिल मुरडिया गायक निळकंठ कोठे,गणपत तसंर आणि आशाबाई नाटे व मंडळाचे भगवंत भोयर यांच्या हस्ते सर्व दिंडी चालकांना व येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन यांच्या हस्ते करण्यात आले.त्यामध्ये नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर सिटी इंडिया मराठी न्यूज चैनल व केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजू नानवटकर यांचेही शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व सर्व महिला दिंडी त्यांना त्यांचा पान विडा आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले डॉ.सुरेश खोडे या कार्यक्रमात हजर होते व संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी सुखदेव तुंबळे,भगवंत भोयर, देवाजी वाकडे,भक्तराज भोयर,रमेश पारिसे,नामदेव झुंजूनकर,जगदीश मेटकर, सुरज सलाम,गजानन वरखडे, व समस्त मोहगाव फुले येथील ग्रामवासी यांनी कार्यक्रमाला भरभरून साथ दिली तसेच गावातून संपूर्ण दिंडी निघतेवेळी स्त्रियांनी नाचून लहान मुलांनी ढोलकीच्या तालावर नाचत उत्साह वाढवला त्यामध्ये सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हा अध्यक्ष मंगला खेडकर हिने नाचण्याचा आनंद व्यक्त केला व मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page